झाडू अन सफाई कामगारच खरे स्वच्छतादूत

झाडू अन सफाई कामगारच खरे स्वच्छतादूत

कोल्हापूर :  सकाळी गळ्यातील शिटी वाजवून "कचरा' अशी आरोळी कानावर पडली की की घरोघरच्या महिला कचऱ्याच्या बादल्या घेऊन धावत जातात. सकाळी सहाला सफाई कामगारांचा दिवस सुरू झाली गल्लोगल्ली सायकल गाडा फिरवून घरी परतेपर्यंत दुपार ओलांडून जाते.

शौचालयांची साफसफाई तर जोखमीचे काम, मात्र हाती बादली आणि खराटा घेऊन काममाग स्वच्छता करतात. शहराच्या आरोग्य सेवेशी असे दोन हजार झाडू आणि सफाई कामगार जोडले गेले आहेत त्यांच्यामुळे आपली घरे तर स्वच्छ राहतात पण सार्वजनिक रस्तेही टकाटक होतात. 

खालच्या दर्जाचे काम करण्याची कोणाची मानसिकता नसते. मात्र सफाई, झाडू आणि आरोग्य विभागाकडील कामगार हेच काम तन्मयतेने करतात. सकाळी सहाला हजेरी लावली की दिवस सुरू होता. झाडू कामगार रस्त्यावर खराटा घेऊन उतरतात.

रस्त्यावरील कचरा एकत्रित गोळा केला जातो. घरोघरचा कचरा सायकल गाड्यात एकत्रित केला जातो. सायकल पुढे ढकलून चांगलीच दमछाक होते. गळ्यातील शिटी वाजल्यानंतर "कचरा' असा आवाज आली कचरेवाला आपल्या दारात आल्याची जाणीव होते. कोंडाळ्यात हा कचरा टाकला जातो. तेथून महापालिकेचे यंत्रणा कंटेनरमधून हा कचरा झूमच्या दिशेने हलविते. शहर असो उपनगर सकाळपासून कामगारांची धावरळ सुरू असते. सॅनिटरी इन्स्पेक्‍टरपासून सगळेच सहापासून रस्त्यावर असतात. एक दिवस जरी कर्मचारी अथवा महिला कर्मचारी गैरहजर राहिले तर त्यांची आवश्‍यकता किती आहे याची जाणीव होते. 

महापालिकेच्या आस्थापनेवर सुमारे साडेपाच हजार कर्मचारी आहेत. यातू सफाई आणि झाडू कामगारंची संख्या सुमारे दोन हजार इतकी आहे. या कामगारंनी नुसता संप करतो म्हंटले तरी शहराच्या स्वच्छेचे काम होणार याची चिंता लागून राहते. कामगार दिनाच्या निमित्ताने राबणाऱ्या हातांना महापालिका प्रशासनाने बळ द्यावी अशी अपेक्षा कामगांतून व्यक्त होत आहे. 

शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास कामगारांचे काम हलके होईल. ओला आमि सुका कचरा वेगळा करून दिला तर बरे होईल. सुभाषनगर सारख्या मोठ्या भागात बारा माणसे काम करतात एवढ्या संख्येवर कशी स्वच्चता होईल. दिवसाआड कर्मचारी दारात आले तर तक्रारीचा सूर नसावा. नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने आमच्याकडे पाहावे. 
- नागेश देसाई, झाडू कामगार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com