शहराची वाहतूक आपल्याच हाती!

- प्रवीण जाधव
शनिवार, 4 मार्च 2017

शहर पोलिसांकडून सुधारित वाहतूक आराखडा; सूचना व हरकती सुचविण्याचे आवाहन

सातारा - शहरातील वाहतुकीचे नियमन सुस्थितीत होण्यासाठी शहर पोलिसांनी सुधारित वाहतूक आराखडा तयार केला आहे. तो सातारकरांसमोर आजपासून मांडत आहोत. जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईटवर तो अपलोड  करण्यात आला आहे. या आराखड्याची पाहणी करून नागरिकांनी आवश्‍यक त्या सूचना व हरकती सुचविण्यासाठी पुढाकार घेतल्यास आपल्या शहराचा अधिक सक्षम वाहतूक आरखडा तयार होऊ शकतो.

शहर पोलिसांकडून सुधारित वाहतूक आराखडा; सूचना व हरकती सुचविण्याचे आवाहन

सातारा - शहरातील वाहतुकीचे नियमन सुस्थितीत होण्यासाठी शहर पोलिसांनी सुधारित वाहतूक आराखडा तयार केला आहे. तो सातारकरांसमोर आजपासून मांडत आहोत. जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईटवर तो अपलोड  करण्यात आला आहे. या आराखड्याची पाहणी करून नागरिकांनी आवश्‍यक त्या सूचना व हरकती सुचविण्यासाठी पुढाकार घेतल्यास आपल्या शहराचा अधिक सक्षम वाहतूक आरखडा तयार होऊ शकतो.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील विविध शहरांमधील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. विविध समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरांचा वाहतूक आरखडा तयार करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले होते. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील व वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक सल्लागार समितीच्या माध्यमातून विविध घटकांशी चर्चा करून शहराच्या वाहतुकीचा सुधारित आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये वाहतुकीशी संबंधित सर्वच घटकांवर विचार करून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

बंद सिग्नल यंत्रणा सुरू करणे
शहरातील मोती चौक, माजी राज्यपाल गणपतराव तपासे रस्ता, शासकीय विश्रामगृह व गोडोली नाका येथील सिग्नल सुरू करण्याची आवश्‍यकता आराखड्यात मांडण्यात आली आहे.

नवीन सिग्नल
शहरामध्ये भू-विकास बॅंक चौक, विसावा नाका (जिल्हा परिषद अध्यक्ष निवास स्थानाजवळ), बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, शिवराज तिकाटणे, वाढे फाटा, जुने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौक, चांदणी चौक, समर्थ मंदिर चौक, विठ्ठल-लीला कॉम्प्लेक्‍स परिसर, किसन वीर पुतळा, पोवई नाक्‍यावर बांधकाम विभागाच्या कमानीजवळ नवीन सिग्नल बसविण्याची सूचना आहे.

झेब्रा क्रॉसिंग
वाहतूक आराखड्यामध्ये पादचाऱ्यांचा विचार करून विविध ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यात मोती चौकात चार, सम्राट चौकात तीन, जुना मोटार स्टॅंड परिसरात तीन, ५०१ पाटी परिसरात चार, शेटे चौकात दोन, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परिसरात दोन, आर. के. बॅटरी परिसरात चार, शहर पोलिस ठाणे तसेच प्रिया व्हरायटीजवळ.  शिवाजी पुतळा परिसरात सात ठिकाणी, साईबाबा मंदिर परिसरात

चार, गोडोली नाक्‍यावर तीन, अजंठा चौकात चार, शिवराज तिकाटणे येथे दोन, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सहा, विसावा नाक्‍यावर चार, जिल्हा परिषद चौकात चार, छत्रपती शिवाजी, धनंजयराव गाडगीळ व आझाद महाविद्यालयांबरोबर कल्याणी शाळेसमोर, जिल्हा परिषद गेट, पुष्कर मंगल कार्यालय, कमानी हौद परिसरात चार, देवी चौक परिसरात चार, शाहू कलामंदिर चौकात तीन, गोल मारुती चौकात चार, बोगदा परिसरात दोन, समर्थ मंदिर येथे सहा, पारंगे चौकात चार, जुने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकात चार, भू-विकास बॅंक चौकात तीन ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्याच्या सूचना आहेत. 

वाहनांचे पार्किंगचे पट्टे मारणे
भारत भुवन ते सुखदेव केटरर्स, सयाजीराव महाविद्यालयासमोर, वाहतूक शाखा कार्यालय ते अजिंक्‍य मटण शॉप, देगावकर नर्सरी ते इंगळे वाईन शॉप, आयडीबीआय बॅंकेसमोर चारचाकी वाहनांसाठी पट्टे मारण्याच्या सूचना आहेत. तर, दुचाकी वाहनांसाठी पोवई नाका ते मोती चौक, मोळाचा ओढा ते शिवराज तिकाटणे, कालिदास पेट्रोल पंप ते वाढे फाटा, पेंढारकर हॉस्पिटल परिसरात अधिकृत पार्किंग पट्टे मारण्याची गरज आराखड्यात व्यक्त करण्यात आली आहे.