स्नेहलोक युथ फौंडेशनच्या वतीने उद्यानाची स्वच्छता मोहिम

clean park campaign on behalf of Snehlok Youth Foundation
clean park campaign on behalf of Snehlok Youth Foundation

अक्कलकोट : स्वच्छ अक्कलकोट सुंदर अक्कलकोट! आपला श्रमदान अक्कलकोटला वरदान! करू नका घाण स्वच्छतेची ठेवा जाण या उक्तीला सार्थ ठरविण्यासाठी स्नेहालोक युथ फौंडेशनचे सदस्य विशाल निंबाळ  व शंकर झुंझा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आपण रहात असलेल्या विकास हॉटेल व नवीन राजवाडा परिसर आणि प्रमिला पार्क उद्यान परिसराचे स्वछता अभियान आणि वृक्षारोपण अश्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून तरुणात एक वेगळा संदेश देऊ केला आहे.पण एवढ्यावरच न थांबता ही तरुण मुले वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळणी,पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्याचा चंग हा युवकांनी बांधला आहे.

सध्याच्या युगात तरुण मुले एकत्र झाली आणि त्यातल्या  मित्राचा वाढदिवस साजरा करायचा म्हंटले की पैश्याचा चुराडा, नृत्य आणि तोंडाला केक फासणे आदी अनेकांना न आवडणाऱ्या प्रकाराने साजरा केला जातो.पण याला अपवाद ठरली ती अक्कलकोटच्या स्नेहलोक युथ फौंडेशनची मित्रमंडळी, त्यांनी आपल्याच मित्राचा वाढदिवस स्वछता अभियान आणि वृक्षारोपण अश्या अनोख्या पद्धतीने साजरा करून आपला आनंद द्विगुणित केला आहे.

या स्वच्छता मोहिमेत अध्यक्ष काशीराया  पाटील, उपाध्यक्ष  सचिन कालीबत्ते, शिवराज  स्वामी, सिद्धाराम कालीबत्ते, धर्मराज भोसगी, भीमाशंकर  वग्गे , अक्षय मंगरुळे, सागर माळाबगी, शिवू हिप्परगी, चरण धरणे, प्रमोद धनशेट्टी, रोहित तेल्लूणगी, राहुल तेलूणगी, सिद्धाराम अस्वले, राहुल वग्गे, गंगाराम पवार, आनंद देसाई, सिद्धाराम निंबाळ, महेश शेडम,राकेश कापसे, चन्ना फताटे, शरणू मसुती, सागर भडोले, समर्थ गोरे, मल्लिनाथ भासगी, नागनाथ अमोगी, संतोष स्वामी, सिद्धार्थ पाटील, गुरु हिरेमठ, विशाल निंबाळ, चंद्रकांत पाटील, पिंटू जाधव, किरण पोतदार आदि या बागेच्या स्वच्छतेसाठी आणि नूतनिकरणासाठी प्रयत्नशील आहेत.

या उपक्रमाचे शहरवाहियांतुन कौतुक होत आहे.स्नेहालोक युथ फौंडेशन अक्कलकोट स्नेहालोक युथ फौंडेशनचे वतीने नवीन राजवाडा समोरील ऐतिहासिक  बागेचे स्वखर्चाने संपूर्ण नुतनीकरण करीत असून सध्या त्याचे काम अंतिम टप्यात आहे. तरी काही दिवसात संपूर्ण नूतनीकरण करून अक्कलकोट शहरवासीयांना व लहान मुलांना अर्पण कण्याची जिद्द स्नेहालोक युथ फौंडेशन घेतले आहे. त्यासाठी फौंडेशनचे अध्यक्ष काशिराया पाटील व सदस्य २९ जूनपासून रोज दोन ते तीन तास श्रमदान करीत आहे.
तरी इच्छुक तरुण व वरिष्ठ मंडळी या श्रमदानात सहभाग व्हावे असे आवाहन देखील स्नेहलोक युथ  करण्यात आले आहे.

प्रमिला पार्क येथील उद्यानात तळीरामांचा त्रास होत असून तिथे विजेची सोय नसल्याचा फायदा घेत, तिथेच बाटल्या रिकाम्या करून तसेच टाकून जात आहेत. तिथे विजेची कायमस्वरूपी सोय करून नागरपरिषदेने पिण्याच्या पाण्याची सोय करावी तसेच पोलिस प्रशासनाने या तळीरामांचा बंदोबस्त करावा अशी या युवकांची व शहरवासीयांची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com