पेन्शन बंद करणे हेच का ते अच्छे दिन? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर, - कॉंग्रेस सरकारच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या; पण त्या योजनेच्या लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्याचा घाट घातला जात आहे. सर्वसामान्यांना अडचणीत आणणारे हेच का ते अच्छे दिन?, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला. कणेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 

सतेज पाटील म्हणाले, ""कॉंग्रेसच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आम्ही काम केले, पण सध्याचे चित्र मात्र उलटे आहे. गावागावांत फिरताना महिला, वयोवृद्ध लोक आपले गाऱ्हाणे माझ्यासमोर मांडत आहेत. जनतेला या सरकारचा खरा चेहरा आता कळला आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात विकासासाठी पुन्हा कॉंग्रेसच सत्तेत येणे आवश्‍यक आहे. त्याची सुरवात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसला निर्विवाद यश देऊनच जनता करेल,'' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी जि. प.चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, कणेरीच्या सरपंच सौ. शिंदे, अशोक पाटील, विजय पाटील, शिवाजी पाटील, कृष्णात कदम, दत्ता सावंत, शंकर पोवार, अंकुश पाटील, मंगल शिंदे, सुजाता गुरव आदी उपस्थित होते. 

पश्चिम महाराष्ट्र

इस्लामपूर (सांगली) : राजू शेट्‌टींचा घसरलेला टीआरपी वाढविण्यासाठी ते माझ्यावर टीका करीत आहेत. त्यांनी अगोदर स्वतःच्या बुडाखालचा...

07.21 PM

पुणे / कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता राहील, असे विधान नुकतेच...

04.33 PM

सोलापूर : देवेंद्र फडणवीस होश मे आओ, पोलिस होश मे आओ, शाहू-फुले-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर या घोषणा देत सोलापुरातील समविचारांनी...

03.33 PM