महाबळेश्‍वर परिसर पुन्हा गारठला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

महाबळेश्वर - येथील वेण्णा लेक तलाव व लिंगमाळा परिसराने आज हिमकणांच्या दुलाई अनुभव घेतला. वेण्णा तलावातील जेटी, गाड्यांवरचे टप हिमकणांनी, तर लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशीच्या व अन्य फळ- पालेभाज्यांच्या बागा, तसेच स्मृतिवन परिसर हिमकणांमुळे सकाळी पांढराशुभ्र दिसत होता.

महाबळेश्वर - येथील वेण्णा लेक तलाव व लिंगमाळा परिसराने आज हिमकणांच्या दुलाई अनुभव घेतला. वेण्णा तलावातील जेटी, गाड्यांवरचे टप हिमकणांनी, तर लिंगमळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशीच्या व अन्य फळ- पालेभाज्यांच्या बागा, तसेच स्मृतिवन परिसर हिमकणांमुळे सकाळी पांढराशुभ्र दिसत होता.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, येथील आजचे किमान तपमान 12.6 अंश डिग्री सेल्सिअस होते. मळेधारकांच्या अनुभवानुसार वेण्णा लेक परिसरात आज शून्य अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी तपमान असण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून पर्यटनस्थळ चांगलेच गारठून गेले होते. आज तर तापमापकातील पारा आणखीनच खाली गेल्याने सर्वत्र कोरडे हवामान होते. कडका व प्रचंड थंडीमुळे सर्वत्र हुडहुडी जाणवत होती. वेण्णा तलाव व लिंगमळा परिसर भल्या पहाटेपासून प्रचंड कुडकुडला होता. लिंगमाळा परिसरातील स्ट्रॉबेरी, फराशी व अन्य फळ- पालेभाज्यांच्या बागा, स्मृतिवन परिसरात मोठ्या प्रमाणावर दवबिंदू गोठले होते. सकाळी-सकाळी परिसरातील निसर्ग, झाडेझुडपे हे आपला हिरवा रंग हरवून गेले होते. वेण्णा तलाव येथील नौकाविहारासाठी नौकेत चढ-उतार करण्यासाठी वापरण्यात येणारी जेटी, याच परिसरातील गाड्यांवरचे टप हिमकणांनी पांढरेशुभ्र दिसत होते. जमलेले हिमकण गोळा करण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. या वर्षीच्या हंगामात दहा डिसेंबरला हिमकण दिसले. मात्र, आज प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिमकण पाहावयास मिळाले.

पश्चिम महाराष्ट्र

गडहिंग्लज : शैक्षणिक जीवनात दहावीचे वर्ष महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांत एका-एका गुणासाठी चढाओढ असते. अशा...

02.00 PM

कऱ्हाड : उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे, त्यातच ...

10.12 AM

कोल्हापूर - डॉल्बी सिस्टीमबाबत आजपर्यंत अनेकवेळा प्रबोधन होऊनसुद्धा पोलिसांना आव्हान देत मंडळांकडून त्याचा वापर केला जातो....

06.03 AM