वित्त आयोगातील निधी खर्च करा मार्चपर्यंत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सोलापूर - तेरावा वित्त आयोगाचा निधी अद्यापही अनेक ठिकाणी खर्च झालेला नाही. तो निधी अखर्चित राहू नये, यासाठी शासनाने त्याची मुदत वाढविली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे आदेश शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. 

सोलापूर - तेरावा वित्त आयोगाचा निधी अद्यापही अनेक ठिकाणी खर्च झालेला नाही. तो निधी अखर्चित राहू नये, यासाठी शासनाने त्याची मुदत वाढविली आहे. येत्या 31 मार्चपर्यंत तेराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचे आदेश शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. 

पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी तेराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी दिला जात होता. तो निधी खर्च करण्याच्या सूचना वेळोवेळी ग्रामविकास विभागाकडून दिल्या जात होत्या. हा निधी 31 डिसेंबरपर्यंत खर्च करण्याच्या सूचना यापूर्वी दिल्या होत्या. मात्र, त्या तारखेपर्यंतही निधी खर्च न झाल्याने राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी यासाठीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार हा निधी खर्च करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जनरल बेसिक ग्रॅंट, जनरल परफॉर्मन्स ग्रॅंट, स्पेशल एरिया बेसिक ग्रॅंट या माध्यमातून पंचायत राज संस्थांना निधी दिला आहे. "महाऑनलाइन' कंपनीकडून तेराव्या वित्त आयोगात राबविण्यात आलेल्या "संग्राम'साठी (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) पुरविण्यात आलेल्या मनुष्यबळाच्या थकीत देणी देण्यासाठी हा निधी खर्च करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. त्यासाठी 31 मार्चची मुदत दिली आहे. या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारच्या खर्चाला मंजुरी दिली जाणार नसल्याचेही शासनाने या आदेशात म्हटले आहे. या कालावधीत निधी खर्च करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांची आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : घराची वाटणी वादातून सख्या भावावर हल्ला करण्याचा प्रकार आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास घडला. या हल्ल्यात...

11.30 AM

तळेगाव दिघे (जि. नगर) : गणेशोत्सव वर्गणीतील जमा झालेल्या रकमेतून मोठी गणेशमुर्ती, मोठा देखावा, महाप्रसाद असा खर्च केला जातो....

10.33 AM

संस्थान गणेशोत्सव सुरू - कागदी लगद्याची मूर्ती सांगली - सांगली संस्थानचे श्री गणेश मंदिर आणि दरबार हॉलमधील गणेशोत्सवाची...

09.21 AM