बालक मृत्यूच्या चौकशीसाठी समिती नेमा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - सीपीआरमध्ये झालेल्या कुपोषित बालक मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तातडीने समिती नियुक्त करा, उपचारात हयगय झाली आहे का, याची चौकशी करा, तसेच सध्या उपचार घेत असलेल्या कोणत्याही मुलांच्या उपचारात हयगय करू नका, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्या. सीपीआर रुग्णालयात अभ्यागत समिती व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, सीपीआरमधील उपचार सेवा सक्षमीकरणासाठी शंभर जागा भरण्यास मंजुरी मिळाली आहे त्या जागा भरा, अन्य वाढीव जागा व आवश्‍यक सुविधांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

अनेकदा एकाकी व्यक्ती उपचारास येतात. त्यांच्यासोबत कोणी नातेवाईक नसतात. उपचार काळात अशा व्यक्ती वॉर्ड अस्वच्छ करतात. त्याचा इतर रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे अशा व्यक्‍तींसाठी स्वतंत्र वॉर्ड होणे अपेक्षित आहे. त्यासाठी बेगर होम होण्यासाठी शहरात बेगर होम ऍक्‍ट लागू करावा लागेल. त्यासाठी न्यायालयीन पातळीवर परवानगी घ्यावी लागते. सध्या सातारा शहरात असा बेगर होम ऍक्‍ट लागू आहे. त्यासाठी आवश्‍यक प्रस्ताव तयार करा, कायदेशीर बाबी तपासून शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा करू, असे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. 

सीपीआरमध्ये ट्रॉमा केअर युनिट सुरू करणार आहे. त्यासाठी शासनाकडून दोन न्यूरो सर्जन नियुक्त होणे तसेच पार्किंगपासून लिफ्ट ऑपरेटरपर्यंत विविध पदावर भरतीसाठी मंजुरी आवश्‍यक असून मनुष्यबळ उपलब्धतेसाठी नवीन प्रस्ताव दिला आहे. कॅन्सर रुग्णांसाठी प्रभावी उपचार कक्षासाठी कॅन्सर ग्रीड शाखा स्थापन व्हावी, त्यासाठी पाठपुरावा करू, असेही क्षीरसागर यांनी सांगितले. अशा प्रकारचा बोर्ड राज्यातील मोजक्‍या शहरात आहे. यातून केमोथेरपीची ते आवश्‍यक त्या शस्त्रक्रियांसाठीची सक्षम सुविधा होऊ शकेल. कोल्हापुरातील रुग्णांना त्यांचा लाभ व्हावा. 
सीपीआर सक्षमीकरणासाठी 15 लाख रुपयांच्या निधीचा विनियोग करा. नियमित उपयोगाची साधने खरेदी करा, उद्‌घाटन सोहळ्यासाठी थांबू नका, सुविधा तातडीने सुरू करा, पालकमंत्र्यांशी बोलून उद्‌घाटनही लवकर करा, असेही श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. अभ्यागत समितीचे सदस्य महेश जाधव, अजित गायकवाड, सुभाष रामुगडे, डॉ. वसंत देशमुख, डॉ. संजय देसाई आदींनी चर्चेत भाग घेतला. 

पेच भूलतज्ज्ञांचा 
सीपीआर रुग्णालयात भूलतज्ज्ञांना 300 रुपये व 700 रुपये एका भेटीसाठी मानधन देण्यात येते. एवढ्या कमी मानधनात भूलतज्ज्ञ मिळणे मुश्‍कील आहे. तरीही काही भूलतज्ज्ञ बांधिलकी म्हणून सेवा देतात. मात्र अनेकदा भूलतज्ज्ञांची कमतरता भासते. त्यामुळे भूलतज्ज्ञांचे मानधन वाढवून 1000 ते 1500 रुपये करावे तसेच तातडीची गरज भासल्यास 2000 रुपये मानधन द्यावे, असा प्रस्ताव दिला असून त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे, असे डॉ. रामानंद यांनी सांगितले. 

पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव :  सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही, असे उर्मट उत्तर...

04.42 PM

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणी साठ्यात चोवीस तासांत ०.२१ टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणी साठा ८८.७५ टीएमसी झाला आहे...

01.54 PM

सांगली - स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रतिक्विंटल वितरण कमिशनमध्ये दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. सध्या प्रतिक्विंटलसाठी...

12.33 PM