राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारेला एक लाखाचे बक्षीस

rahul-aware
rahul-aware

वालचंदनगर - राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये राहुल आवारे यांनी कुस्तीमध्ये सुवर्णपदक फटकावून देशाचे नाव उज्वल केले. त्याबद्दल फडतरे उद्योग समुहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांनी आवारे यांचा सत्कार करुन एक लाख रुपये रक्कमेचा धनादेश देवून गौरविणण्यात आले.

कळंब-वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे फडतरे उद्योग समुहाने कै.बाबासाहेब फडतरे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या मैदानामध्ये आयोजित केलेल्या कार्य्रकमामध्ये यावेळी राहुल आवारे बोलत होते.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धा जिंकण्यासाठी ग्रामीण भागातील कुस्तीपट्टूंनी मॅटरवरील कुस्ती स्पर्धांचा सराव करणे गरजेचे असल्याचे मत आवारे यांनी व्यक्त केले.

यावेळी माढ्याचे आमदार बबन शिंदे, अभिनेत्री तेजस्विनी लोणारी, फडतरे उद्येाग समुहाचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, मल्लसम्राट रावसाहेब मगर, सुदाम महाराज गारेखे, बाळकृष्ण लोणारी, सुभाष जाधव,मधुकर पाटील, भारत रणमोडे, संदीप पानसरे,के.बी गवळी उपस्थित होते. 

यावेळी आवारे यांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये मैदानी खेळ खेळणारे उत्कृष्ठ खेळाडू आहेत. अनेक मुले लाल मातीमध्ये चांगली कुस्ती खेळत असतात. मॅट व लाल मातीमधील कुस्तीस्पर्धेमध्ये फरक आहे. मॅटवरील कुस्तीसाठी चपळता महत्वाची असून कुस्तीला गती जास्त असते. जगामध्ये देशाचे नाव मोठे करुन पदके मिळविण्यासाठी खेळाडुंनी लाल मातील कुस्तीबरोबर मॅटवरती कुस्ती स्पर्धेचा नियमित सराव करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com