बारावीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे, मोफत करा - खासदार महाडिक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - बारावीपर्यंतचे शिक्षण सर्वांना सक्तीचे व मोफत करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. दिल्लीत केंद्रीय मानव संसाधन विभागातर्फे झालेल्या देशाच्या शैक्षणिक धोरण ठरविण्यासंदर्भातील बैठकीत त्यांनी ही मागणी केली. अध्यक्षस्थानी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर होते. 

कोल्हापूर - बारावीपर्यंतचे शिक्षण सर्वांना सक्तीचे व मोफत करावे, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. दिल्लीत केंद्रीय मानव संसाधन विभागातर्फे झालेल्या देशाच्या शैक्षणिक धोरण ठरविण्यासंदर्भातील बैठकीत त्यांनी ही मागणी केली. अध्यक्षस्थानी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर होते. 

देशभरातील विविध पक्षांच्या पन्नास खासदारांना बैठकीसाठी निमंत्रित केले होते. त्यात श्री. महाडिक यांचा समावेश होता. त्यांनी धोरणाविषयी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. त्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व बीसीयूडीचे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांच्याशी चर्चा केली होती. आनंददायी शिक्षणासाठी अंगणवाडीत खेळणी असावीत, अंगणवाडीचा परिसर स्वच्छ व प्रसन्न असावा, आदिवासी, मतिमंद, अस्थिव्यंग, अपंग मुलांच्या शाळा व आश्रमशाळांतील गैरसोयी दूर करून चांगल्या शाळांना अनुदान द्यावे, दहावीपर्यंतचे शिक्षण केवळ पुस्तकी न देता कौशल्यावर आधारित द्यावे, दहावीकरिता पंचवीस विषय ठेवून ऐच्छिक विषय निवडण्याची विद्यार्थ्याला संधी असावी, अकरावी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणात कौशल्य विकासाला अधिक चालना द्यावी, प्रत्येक विद्यार्थ्याला सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य करावे, अशी मागणी केली. 

शिक्षक भरती करावी, शिक्षकांना वारंवार प्रशिक्षण द्यावे, विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांचा आकडा शंभरवर आणावा व शैक्षणिक दर्जावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्र

माझ्या मंत्रीपदामुळेच त्यांना पोटशुळ; ...ती आत्मक्‍लेष यात्रा नव्हे सदाभाऊ द्वेष यात्रा सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून...

07.45 PM

सातारा - पावसाने लागोपाठ दगा दिला. पेरलेल्या पिकाला कोंबच फुटले नाहीत. घर, शेतावर काढलेलं कर्ज वाढत गेलं. बा सारखा इचारात असायचा...

11.15 AM

कऱ्हाड ः तालुक्यात स्वाइन फ्लूच्या रूग्णात वाढ होत आहे. त्यातच काल रात्री निगडी (ता. कऱ्हाड) येथील एकाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू...

10.51 AM