सोलापूर शहरात दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा पेट्रोल, डिझेल, गॅसची प्रचंड दरवाढ झाली आहे. यात सातत्याने वाढच होत असुन यांचा फटका वाहन चालकांसोबतच सर्वसामान्य जनतेची लूट चालू आहे.

सोलापूर - केंद्र व राज्य सरकारच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरात प्रचंड दरवाढ केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दुचाकी वाहनांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
 
यावेळी शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाचे भाव कमी असताना सुद्धा पेट्रोल, डिझेल, गॅसची प्रचंड दरवाढ झाली आहे. यात सातत्याने वाढच होत असुन यांचा फटका वाहन चालकांसोबतच सर्वसामान्य जनतेची लूट चालू आहे. या दरवाढी मुले प्रचंड महागाई वाढणार आहे. म्हणून ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी यासाठी आज रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही दुचाकी वाहनांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी न झाल्यास भविष्यात आपल्यालाच वाहनांना उचलून नेण्याची परिस्थिती येणार आहे. म्हणून भाजप प्रणित केंद्र सरकारने दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा सर्वसामान्य जनताच मताच्या बुक्क्याने मारून यांना सत्तेवरून खाली खेचून भाजपची अंत्ययात्रा काढणार आहे.

या दुचाकी वाहनांच्या अंत्ययात्रेत प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, माजी आमदार निर्मला ठोकळ, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका परवीन इनामदार, लोकसभा अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, शहर युवक अध्यक्ष बाबा करगुळे, गणेश डोंगरे, महेश घाडगे, संजय गायकवाड, नलिनी चंदेले, अलका राठोड, तिरुपती परकीपंडला, गोविंद कांबळे, सिद्धाराम चाकोते, राहुल वर्धा, आंबदास गुत्तीकोंडा, सोहेल शेख, सुमन मन्सूर शेख, जाधव, कमरुणीसा बागवान, विवेक कन्ना, दीनानाथ शेळके, चंद्रकांत कोंडगुळे, प्रकाश कोडम, चक्रपाणी गज्जम, प्रवीण जाधव, राहुल गोयल, संतोष अट्टेलुर, कय्युम बलोलखान, रुस्तुम कंपली, सादिकभैय्या, उपेंद्र ठाकर, श्रीनिवास तोपुल, वीणा देवकते, सुभाष वाघमारे, नागेश बोमडयाल, जिशान शेख, प्रतीक शिंगे, शोभा बोबे, माधुरी कांबळे, अनुपम शहा, अनिल मस्के, यांच्यासह अनेक नागरिक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
Web Title: Congress Agitation For Increasing petrol diesel Price in Solapur