सातत्याने होतेय मानवी हक्कांचे उल्लंघन !

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

मानवी हक्कांची अंमलबजावणी होत नाही. लोकांना आपले हक्क, अधिकार माहीत नाहीत. याविषयी माहिती व्हावी म्हणून आम्ही शाळा, महाविद्यालयांमध्ये शिबिर आयोजित करतो. एखाद्यावर अन्याय होत असेल तर आम्ही तज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून कायदेशीर लढा देतो. आजवर अनेकांना मदत केली आहे.
- इरफान सय्यद,
जिल्हाध्यक्ष, ह्यूमन राइट असोसिएशन

जनजागृती आवश्‍यक असल्याचे तज्ञांचे मत ; संस्था, संघटना करताहेत प्रयत्न

सोलापूर : माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला घटनेने जे हक्क, अधिकार दिले आहेत त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सातत्याने मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. बहुतांश लोकांना आपल्या हक्कांची माहितीच नाही. सर्वसामान्य घटकातील जनतेची अवस्था तर विचार करण्याच्या पलीकडे असल्याचे दिसून येते.

मानवी हक्काविषयी सर्वत्र नकारात्मक चित्र असले तरी सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने काही प्रमाणात का होईना सकारात्मक काम होत आहे. मानवी हक्‍काचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आल्यानंतर ह्यूमन राइट असोसिएशनसारख्या संघटना पाठपुरावा करताना दिसतात. मानवी हक्कांची माहिती सर्वांना व्हावी म्हणून शाळा, महाविद्यालयांमधूनच त्याबाबत गांभीर्याने शिक्षण देणे गरजेचे आहे.

 

पश्चिम महाराष्ट्र

कडेगाव - सोनसळ (ता. कडेगाव) येथील आराध्य दैवत श्री चौरंगीनाथाची यात्रा आज श्रावणातील शेवटच्या सोमवारी हजारो भाविकांच्या...

12.39 AM

फलटण शहर - चालकास चक्कर आल्यामुळे त्याचा एसटी बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याकडेच्या शेतात पलटी झाल्याची दुर्घटना आज राजाळे...

12.36 AM

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) - मुंबईला बैठकीसाठी जाणाऱ्या साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे आज अपघातातून सुदैवाने वाचले....

सोमवार, 21 ऑगस्ट 2017