शाहूंचा वारसा सामाजिक कृतीतून जोपासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सामाजिक कृतीतून जोपासा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सामाजिक कृतीतून जोपासा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.
जुना बुधवार पेठ तालीम मंडळाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील 30 तालमींना शाहू राजांच्या अर्धपुतळ्याचे वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्ही. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते.

शाहू महाराज म्हणाले, ""शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे आज समृद्धता नांदत आहे. त्यांचे विचार आजच्या पिढीत रुजावेत, यासाठी जुना बुधवार पेठेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मंडळाचे सचिव सुनील शिंदे यांनी शाहूंचे विचार समाजात पोचवण्यासाठी शाहू राजांचे पुतळे वितरित करण्यासाठी उचललेले पाऊल आदर्शवत आहे.'' या वेळी शिपुगडे तालीम मंडळ, मोतीबाग तालीम मंडळ, शाहू विजयी गंगावेस तालीम, उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम, महाकाली भजनी मंडळ, रंकाळावेश तालीम, वेताळमाळ तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, सरदार तालीम मंडळ, नाथा गोळे तालीम मंडळ, महाकाली तालीम मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ, नंगीवली तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, काळाईमाम तालीम मंडळ, भोई गल्ली तालीम मंडळ, बजाप माजगावकर तालीम मंडळ, अवचितपीर तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, तटाकडील तालीम मंडळ, दत्त महाराज तालीम मंडळ, तुकाराम माळी तालीम मंडळ, सुबराव गवळी तालीम मंडळ, धोत्री गल्ली तालीम मंडळ, सत्यनारायण तालीम मंडळ, राष्ट्रीय संघ मोतीबाग तालीम, खोल-खंडोबा तालीम मंडळ, सणगर गल्ली तालीम मंडळ, बजापराव माने तालीम मंडळांना पुतळे देण्यात आले.

या प्रसंगी यौवराज यशराजे, माजी महापौर आर. के. पोवार, भिकशेठ पाटील, ऍड. महादेवराव आडगुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नगरसेविका सरिता मोरे, नगरसेवक अफजल पिरजादे, मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, अशोक पोवार उपस्थित होते. सुनील शिंदे यांनी प्रास्ताविकात पुतळे वितरण करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. रणजित शिंदे यांनी स्वागत केले.

Web Title: continue the legacy of shahu with actions