नगरमधील धुडगूस प्रकरणातील आरोपी नगरसेवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नगर : पोलिस कोठडीत असलेले नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले (वय 55 रा. माळीवाडा, नगर) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी रात्री उशिरा ससून (पुणे) रुग्णालयात उपचारा सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घातला. याप्रकरणी नगरसेवक कैलास गिरवले यांना पोलिसांनी अटक केली होती. त्या गुन्ह्यातून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यामुळे ते नाशिक कारागृहात होते. 

दरम्यान, पोलिसांनी माळीवाडा परिसरातील कैलास गिरवले यांच्या "कपिलेश्‍वर' फटाकेविक्रीच्या दुकानावर छापा घातला. त्यात अवैध फटाके, मादक पदार्थ सापडल्याने कोतवाली पोलिसांनी कैलास गिरवले यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कोतवाली पोलिसांनी त्यांना नाशिक येथून कोवताली पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करून आणले. त्यात गिरवले यांना शनिवारी (ता. 14) एक दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडीमध्ये असताना रविवारी सकाळी कैलास गिरवले यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना पुणे येथे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोमवारी सकाळीपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मावळली. त्यावेळी ससून रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

दरम्यान, कैलास गिरवले यांनी दीर्घकाळ नगरसेवक म्हणून काम पाहिले. कपिलेश्‍वर मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. नगर शहर फटाका असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. नगर शहरातील राजकारणाबरोबर त्यांचा समाजकारणात मोठा वाटा होता. 

दरम्यान, गिरवले यांचे बंधू बाबासाहेब गिरवले यांनी सोमवारी रात्री उशीरा पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे आपल्या भावाचा मृत्यू झाला, असे त्यांनी तक्रारीत म्हटले असल्याचे समजते.

Web Title: corporater Kailas Girwale dead in hospital accused in Nagar riot case