सांगलीत तरूणावर भरदिवसा गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

सांगली : कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर चौकात दुचाकीवरून आलेल्या सहाजणांनी अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (वय 22, मूळ रा. पंढरपूर, सध्या रा. दत्तनगर) याच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार दुपारी बाराच्या दरम्यान घडला. बबलूने गोळी चुकवून स्वत:ची दुचाकी मारेकऱ्यांवर ढकलली. त्यामुळे मारेकरी पडल्यानंतर बबलू पळाला. तर संधी हुकल्यानंतरही मारेकरी तत्काळ दुचाकी उचलून पळाले.

बबलू हा मुळचा पंढरपूरचा असून तीन वर्षापूर्वी तेथील काहीजणांशी वाद झाला होता. बबलू आणि त्याच्या आई-वडीलांना मारहाण झाली. या प्रकरणामुळे आई-वडीलांनी बबलूला सांगलीत मामाकडे पाठवले होते. मामाचे दत्तनगर येथील गोवर्धन चौकात बांबू विक्रीचे दुकान आहे. आज सकाळी बबलू दुकानात गेला होता. कामानिमित्त दुचाकीवरून सांगलीकडे येण्यास निघताना गोवर्धन चौकात मागून दोन दुचाकीवरून सहाजण त्याच्या जवळ आले. एका दुचाकीवर मागे बसलेल्या तरूणाने रिव्हॉल्व्हर किंवा पिस्तुलसारखे हत्यार काढून बबलूवर गोळीबार केला. बबलूने गोळी चुकवून मागे पळाला. तोपर्यंत चौकात नागरिक गोळा झाले. गर्दी पाहून मारेकरी दुचाकी उचलून सांगलीच्या दिशेने पसार झाले. मारेकरी पळाल्यानंतर बबलूने मामाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर सांगली शहर पोलिस ठाण्यात येऊन माहिती सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तसेच पंचनामा केला. पूर्व-वैमनस्यातून बबलूवर गोळीबार केला असावा अशी शक्‍यता पोलिसांनी प्राथमिक पाहणीत व्यक्त केली आहे.
 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे, त्यातच ...

10.12 AM

कोल्हापूर - डॉल्बी सिस्टीमबाबत आजपर्यंत अनेकवेळा प्रबोधन होऊनसुद्धा पोलिसांना आव्हान देत मंडळांकडून त्याचा वापर केला जातो....

06.03 AM

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज प्रथमच खासदार राजू...

05.48 AM