सोलापूर: तिहेरी हत्याकांडाचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

सोलापूर - तिऱ्हे येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरातील तिहेरी खून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. बेपत्ता असलेल्या दोन्ही मुलींना पुणे परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, आज (सोमवारी) गुन्ह्याचा खुलासा करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक अभय डोंगरे यांनी सांगितले. 

मूळचे गुजरातचे असलेले रणसोड जाधव आणि त्यांचे कुटुंबीय तिऱ्हे येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरात झोपडी करून राहतात. लोखंडी गजाने मारून जाधव यांची पत्नी हयातबाई, मुलगी लाखी व मुलगा मफा या तिघांचा शुक्रवारी पहाटे खून झाला. तर या कुटुंबातील दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिस ठाण्याचे पथक या गुन्ह्याचा शोध घेत होते. रविवारी सायंकाळी पुणे परिसरातून बसमधून प्रवास करताना दोन्ही मुलींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डोंगरे यांनी दिली.

Web Title: crime triple murder police got clue