एका महिन्यात एक हजार दुचाकींवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

सोलापूर - मार्च महिन्यात राबविलेल्या कारवाईत एक हजार दुचाकींवर कारवाई करण्यात आली. यातील ९५४ जणांनी नियमित दंड भरून आपली दुचाकी सोडवून घेतली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली.

दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणे, परवाना नसणे, वाहनांची कागदपत्रे नसणे आदींवर कारवाई करण्यात आली. एखादे वाहन सापडल्यानंतर त्याच्या चेसी क्रमांकावरून वाहनाची माहिती काढली जाते. एखादे वाहन बेवारस आढळल्यास त्या वाहनांचा लिलाव केला जातो. .

बेवारस रिक्षांच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत आरटीओ विभागाला ५० लाखांचा महसूल मिळाला. सोलापुरात स्क्रॅप रिक्षा वापरण्याचे प्रमाण मोठे आहे. बाहेरील शहरातून रिक्षा आणून त्या सोलापुरात चालवतात. सध्या आरटीओ कार्यालयात अशा दोन रिक्षा आहेत. कमीत कमी प्रत्येक सहा महिन्यानंतर आरटीओकडून अशा वाहनांचा लिलाव केला जातो. आरटीओ परिसरात ठेवण्यात आलेल्या वाहनांची चोरी होत होती. आता मात्र चार सीसीटीव्ही कॅमेरांमुळे या चोरीस आळा बसला आहे.

आरटीओ आणि पोलिसांच्या मदतीने सध्या नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. शहरातील सर्वच भागातील वाहनांवर कारवाई करण्यासाठी व वाहतुकीला आणखी शिस्त आणण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी शासनाकडून दहा परिवहन निरीक्षकांची मान्यता मिळाली आहे. एका वर्षात ही पदे भरली जातील.
  - बजरंग खरमाटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: crime on two wheeler