ठेकेदाराकडे निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या बसवराज यांनी फॅनला गळफास घेवून आत्महत्या

बेळगावच्या ठेकेदाराने सहा महिन्याचे वेतन न दिल्याने त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले
crime update Balehonnur lodge committed suicide by strangling fan belgaum
crime update Balehonnur lodge committed suicide by strangling fan belgaum sakal

बेळगाव : ठेकेदार संतोष पाटील आत्महत्येची घटना ताजी असतानाच ठेकेदाराकडे निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील आणखी एकाने बाळेहोन्नूर (जि. चिक्कमंगळूर) लॉजमध्ये फॅनला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. बसवराज लिंगाप्पा (वय ४७, रा. मुनहळ्ळी (ता.सौंदत्ती) असे त्याचे नाव आहे.

बसवराज यानी बाळेहोन्नूर येथील लॉजमध्ये आत्महत्या केली. सुरूवातीला आत्महत्या केलेला व्यक्ती ठेकेदार असल्याचे बोलले जात होते. मात्र, तो ठेकेदार नसुन ठेकेदाराकडे निरीक्षक म्हणून कामाला होता. असे स्पष्ट झाले. कर्जबाजारीपणा आणि वेळेत पगार मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद कुटुबीयांनी पोलिसात दिली आहे. बसवराज यापुर्वी बेळगातील एका ठेकेदाकडे निरीक्षक म्हणून सहा वर्षे कामाला होता. त्यानंतर बाळेहोन्नुरला परतल्यानंतर सहा महिन्यापासून आनखी एका ठेकेदाराकडे निरीक्षक म्हणून कामाला लागला होता.

बेळगावात काम करत असताना त्याने हात उसने पैसे घेण्यासह काही बॅंकातून देखील कर्ज घेतले होते. तसेच बेळगावच्या ठेकेदाने सहा महिण्याचे वेतन न दिल्याने त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बसवराजने आत्महत्या करण्यापुर्वी एक पत्र लिहिले आहे. डेथ नोटमध्ये कर्जाबरोबरच वेतन देण्यात आले नसल्याने झालेल्या त्रासाबद्दल लिहीले आहे. सदर पत्र ताब्यात घेवून बाळेहोन्नुर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पत्रात पत्नी रत्न, मुलगा साईकुमार, हेमंतकुमार यांच्याबाबतही लिहिले आहे. मृत बसवराज यांचे बेळगातून बाळेहोन्नुरला आल्यानंतर लॉजमधील मृतदेहाचा पंचनामा करून बाळेहोन्नुर रूग्णालयात शल्यचिकित्सा करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुन्हा दाखल करून घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com