भिलवडी प्रकरणातील आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

बलात्कारानंतर भीतीपोटी केला खून
भिलवडी - सांगली जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या भिलवडी (ता. पलूस) येथील अल्पवयीन शालेय मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाचा नवव्या दिवशी पोलिसांनी छडा लावला. रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत ऊर्फ सोन्या ऊर्फ हिमेश राजेंद्र सोंगटे (वय 26, माळवाडी, ता. पलूस) याला शनिवारी अटक केली. ही घटना 5 जानेवारी रोजी घडली होती.

बलात्कारानंतर भीतीपोटी केला खून
भिलवडी - सांगली जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेल्या भिलवडी (ता. पलूस) येथील अल्पवयीन शालेय मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाचा नवव्या दिवशी पोलिसांनी छडा लावला. रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत ऊर्फ सोन्या ऊर्फ हिमेश राजेंद्र सोंगटे (वय 26, माळवाडी, ता. पलूस) याला शनिवारी अटक केली. ही घटना 5 जानेवारी रोजी घडली होती.

आईबरोबर भांडून मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर प्रशांतने तिचा पाठलाग केला. खंडोबाचीवाडी परिसरात तिच्यावर बलात्कार केला. नंतर ती तक्रार करेल, या भीतीपोटी तोंड दाबून तिचा खून केल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न केले. या खुनाच्या तपासात दीडशेहून अधिक पोलिस गुंतले होते. पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले, ""या प्रकरणाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. आरोपीने कोणताही पुरावा किंवा मागमूस ठेवला नव्हता. खुनाचा तपास परिस्थितीजन्य पुरावा आणि शास्त्रीय पुरावे शोधून करण्यात आला. भक्कम आणि बळकट पुरावे शोधून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यादृष्टीने तपास केला.''

ते म्हणाले, 'सोंगटे हा मुलीच्या घराच्या परिसरातच राहत होता. तो काही दिवसांपासून तिचा पाठलाग करीत होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुलगीच्या कुटुंबाशी संबंधित 115 जणांची चौकशी करण्यात आली. ठोस पुरावे हाती आल्यानंतर सोंगटेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. आणखी काही संशयितांचा सहभाग आहे काय? याचाही तपास केला जाईल.''

"कॅंडल मार्च'मध्ये आरोपी
मुलीवर बलात्कार करून खून केल्याचा प्रकार 6 जानेवारीला उघडकीस आला. त्यानंतर जिल्ह्यासह राज्यभर तीव्र पडसाद उमटले. सोशल मीडियासह सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ भिलवडी ग्रामस्थांनी सायंकाळी "कॅंडल मार्च' काढला. त्यामध्ये प्रशांत सोंगटे अग्रभागी असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र

सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना केव्हा पकडणार, याचा जाब आज ‘...

02.33 AM

सांगली - प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळाची परंपरा कायम राहिली. गोंधळातही सभेचे कामकाज 25 मिनिटे...

02.33 AM

कोल्हापूर - "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका करून घेण्यासाठी...

02.33 AM