सातारा - गारपीटीमुळे शेतीचे आतोनात नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

तारळे (सातारा) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात तारळे भागातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. मंगळवारी झालेली गारपीट आजही रानात गारा असल्याचे दिसून येत आहे. या अवकाळीत दोघांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. संबंधित यंत्रणेने दोन्ही ठिकाणी पंचनामा केला आहे. मात्र पवार व कदम कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

जळव ता. पाटण येथील अरविंद पवार यांचे तळोबा नामक शिवारात शेती व घर आहे. तेथील परिसरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसावेळी पावसा ऐवजी मोठी गारपीट झाली. या गारपीटीत त्यांचे दोन एकरातील शाळू, भुईमूग, मिरची, वांगी, मका आदी पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. ही गारपीट एवडी प्रचंड होती की रानात दोन तीन फुटाचा थर साचला होता. गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे पान न पान झडून गेले अगदी हत्ती गवत सुद्धा. त्याच बरोबर गुरांचे छत उडून गेले तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाने विहीर भरून गेली. दोन दिवसांनंतर ही मातीत अजूनही गारांचा खच आहे यावरून गारपीट कीती मोठी होती याची कल्पनाच केलेली बरी. अरविंद पवार यांचे यात सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दुसऱ्या घटनेत वाघळवाडी ता. पाटण गावातील प्रकाश कदम यांचे राहत्या घरावरील संपूर्ण पत्रा लोखंडी सांगाड्यासह उडून गेला. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र कदम कुटुंबीय भयग्रस्त झाले होते. सोसाट्याचा वादळात 30 बाय 21 फूट आकाराचे लोखंडासाहित अखंड छत घरासमोरील एका घरावर आदळून सुमारे शंभर फूट लांब मोकळ्या रानात उडून पडले. छत उडून गेल्याने घरातील दोन पोती गहू व शाळू, पाच पोती भात, एक पोते हरभरा, तसेच कडधान्ये बियाणे पावसात भिजले. तलाठी यांनी तातडीने पंचनामा केला आहे. या वादळात त्यांचे सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. कदम यांनी हे घर वर्षा पूर्वीच बांधले होते. अल्प काळातच नैसर्गिक आपत्ती आल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: crops damage due to hailstorms in satara