धरणांचा पाणीसाठा निम्‍म्‍याहून अधिक

Dam water
Dam water

सातारा - पावसाळा संपल्यानंतर पुन्हा अवकाळी पावसानेही हजेरी लावलेली नाही. तरीही जिल्ह्यातील धरणांत ५० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. आणखी दोन महिने सहज पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. तसेच उरमोडी, धोम, कण्हेरमधून कालव्यांव्दारे पाण्याची आवर्तने सुरू असल्याने दुष्काळी माणसह सर्व ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता जाणवत नसल्याचे चित्र आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. सध्या उरमोडी धरणातील पाणी कालव्याद्वारे माणला तसेच सातारा तालुक्‍याला नदीतून पाणी सोडले आहे. यासोबत धोम आणि कण्हेर धरणातूनही कालव्यांव्दारे आवर्तने सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. याचे श्रेय गावोगावी झालेल्या जलयुक्त शिवारच्या कामांना जाते. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत केवळ पाच टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

जिल्ह्यातील धरणांतही ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. सर्वाधिक ७२ टक्के पाणी उरमोडी धरणात आहे तर ४० टक्के पाणी कण्हेर आणि तारळी धरणात शिल्लक आहे. धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (द.ल.घ.मी.मध्ये) : उरमोडी १९९, कण्हेर १११, कोयना १६५८, तारळी ६६, धोम १७७, बलकवडी ३८, वीर १४९.

धरणांतील पाण्याची टक्केवारी
धरणांतील आजचा व कंसात गेल्या वर्षी आजच्या दिवशीची पाण्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे : उरमोडी ७२.९९ (५४.४६), कण्हेर ४०.६९ (२९.७३), कोयना ५३.३५ (३१.७०), तारळी ४०.०६ (४७.०४), धोम ५३.४८ (३२.७३), धोम बलकवडी ५३.८८ (२८.१८), वीर ५६.०६ (५९.२२).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com