८ ते १६ जून या कालावधित बेलानाथ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव

राजशेखर चौधरी
शनिवार, 2 जून 2018

अक्कलकोट (सोलापूर) : श्री राजेराय मठ अक्कलकोट येथे सद्गुरु बेलानाथ महाराज यांचा पंधरावा पुण्यतिथी महोत्सव ता.८ ते १६ जून या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती विकास दोडके यांनी दिली आहे. या काळात धर्मसंकीर्तन अखंड नाम सप्ताह संपन्न होणार आहे. यावेळी संत श्री ज्ञानेश्वर वारकरी मंडळ श्रीरामपूर यांच्या सहकार्याने ८ जून ते १६ जून या कालावधीत अखंड नाम वीणा सप्ताह, श्री साई सच्चरीत ग्रंथपारायण, प्रवचन, कीर्तन व भक्ती संगीत कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

शुक्रवारी (ता.८) सत्संग महिला भजन मंडळ अक्कलकोट, शनिवार ता.९ रोजी बेला समर्थ महिला भजन मंडळ अक्कलकोट, रविवार ता.१० रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज महिला भजन मंडळ अक्कलकोट, सोमवार ता.११ रोजी श्री विठ्ठल मंदिर महिला भजन मंडळ अक्कलकोट,मंगळवार ता.१२ रोजी स्वकुळ साळी समाज भजनी मंडळ अक्कलकोट, बुधवार ता.१३ रोजी मनोहर देगावकर अक्कलकोट या सर्वांचे दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत भक्ती संगीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यावेळी ताम्हाणे महाराज,भाऊसाहेब राऊत आणि मुक्ताबाई शेजुळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.त्याच प्रमाणे गुरुवार ता.१४ रोजी सायंकाळी सात वाजता संध्या खांबेटे (संगीत अलंकार मुंबई) प्रस्तूत अजित दामले,चंद्रशेखर व सुजित मोघे यांच्या सहकार्याने ' गीत संध्या ' हा बहारदार कार्यक्रम होणार आहे.शनिवार ता.१६ रोजी गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे.या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.याचे संयोजन अध्यक्ष अॅड.शरद फुटाणे,सचिव प्रा. किसन झिपरे,डी एस जयदेव, अॅड.अनिल मंगरुळे, दत्तात्रय मोरे,भुवनेश वर्दे,वत्सला मोरे,बिल्वराज नाबर,विजयकुमार गाजूल,ओमप्रकाश तळेकर आदी करीत आहेत

मुख्य पुण्यतिथी उत्सव १५ रोजी
सद्गुरू बेलानाथ महाराज यांचा पंधरावा पुण्यतिथी मुख्य सोहळा शुक्रवार ता.१५ जून रोजी संपन्न होणार आहे.ज्यात समाधी पूजन, श्री समाधीवर सामुदायिक अभिषेक,महाआरती,महाप्रसाद,पालखी सोहळा आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत रथोत्सव होणार आहे.

Web Title: death anniversary program of belnath maharaj in 8 to 16 june