शिराळा तालुक्यात महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

शिराळा तालुक्यात महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

बिळाशी - मांगरूळ (ता. शिराळा) येथील शालन शिवाजी कुंभार (वय ५५) या महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. गावातील हा तिसरा मृत्यू असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

घरोघरी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत सर्दी, ताप, खोकला, अशक्‍तपणाचे रुग्ण दिसून येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच खासगी दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहेत.

शालन कुंभार यांना पाच-सहा दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने कोल्हापुरातील डायमंड इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रक्त तपासणी अहवालात त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, पती असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन रविवारी (ता. २३) आहे. यापूर्वी मांगरूळमधील अंजना नंदकुमार खांडेकर, नंदाताई मानसिंग खांडेकर यांचे मृत्यू झाले आहेत; तर आणखी एका महिलेवर कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऐन गणेशोत्सवात तीन महिलांचे निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. आतापर्यंत या गावातील पवूबाई आढाव, अंजना खांडेकर, नंदाताई खांडेकर, नथुराम फोंडे, राजाराम सापते आदींचे मृत्यूदेखील याच रोगाने झाले असल्याची शंका व्यक्‍त होत असून त्याची चर्चा दबक्‍या आवाजात सर्वत्र सुरू आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मदत देऊन उभारी देण्याचा शासनस्तरावर निर्णय व्हावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.
 
गावाने बांधला तोंडाला रुमाल
गावातील ग्रामस्थ महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी  प्राथमिक खबरदारी म्हणून कापूर, वेलची चूर्ण खिशात ठेवून; तसेत रुमालात घेऊन हुंगताना दिसत आहेत. तर महिला वर्ग तेच चूर्ण साडीच्या पदराच्या टोकाला बांधून हुंगताना दिसत आहेत. सर्रास गावामध्ये तोंडाला रुमाल बांधून ग्रामस्थ फिरताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com