अतिरिक्त शिक्षकांना डिसेंबरपर्यंत पगार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

सोलापूर - सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात जवळपास चार हजार शिक्षक अतिरिक्त आहेत. या शिक्षकांना सरकारच्या वतीने पगार दिला जातो. अशा अतिरिक्त शिक्षकांचा पगार देण्यासाठी सरकारने डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सरकारने 13 एप्रिलच्या निर्णयानुसार राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या ठिकाणच्या शाळांमध्ये 2013-14 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जूनपर्यंत पगार देण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याची मुदत संपली आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने त्याला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातील अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची स्थिती काय आहे, याचा आढावा डिसेंबरमध्ये सरकारला देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तोपर्यंत अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा पगार हा ऑफलाइन पद्धतीने केला जाणार आहे. अतिरिक्त शिक्षकांनाही ऑनलाइन पद्धतीने पगार देण्याबाबतची सुविधा निर्माण करून देण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न डिसेंबरपर्यंत मिटला आहे.