‘ईव्हीएम’च्‍या चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

सोलापूर - अनेक ठिकाणी विरोधी पक्ष सर्वच दृष्टीने कमकुवत असतानाही त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. सकृतदर्शनी ‘ईव्हीएम’मध्ये भाजपच्या उमेदवारांना फायदेशीर व्हावे, अशा पद्धतीने सेटिंग झाल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी शहरातून व जिल्ह्यातून अनेक उमेदवारांकडून येत आहेत. तरी याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केली. 

काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (ता. २६) सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने निवडून आलेल्या चेतन नरोटे, रफिक हत्तुरे, बाबा मिस्त्री, शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, वैष्णवी करगुळे, प्रवीण निकाळजे, फिरदोस पटेल, प्रिया माने, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे, अनुराधा काटकर, परवीन इनामदार या नूतन नगरसेवकांचा शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्या वेळी श्री. खरटमल बोलत होते. या वेळी माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार निर्मला ठोकळ, महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी महापौर सुशीला आबुटे, अंबादास गुत्तीकोंडा, सुनील रसाळे, प्रसिद्धिप्रमुख तिरुपती परकीपंडला, सुनील इंगळे, सूर्यकांत शेरखाने आदी उपस्थित होते. या वेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अंबादास गुत्तीकोंडा यांनी आभार मानले.

ज्या उमेदवारांची आपल्या प्रभागात ‘ईव्हीएम’संदर्भात तक्रार असेल त्यांनी त्याची संपूर्ण माहिती काँग्रेस कमिटीकडे सादर करावी. ती माहिती घेऊन उच्च न्यायालयात दावा दाखल करू.
- सुधीर खरटमल, शहराध्यक्ष

Web Title: The demand for an inquiry EVM