मोहोळ - खंडीत होणारा वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 25 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : मोहोळध्ये महावितरणच्या विजेने लपंडावाचा खेळ मांडला असुन उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी नियमीत खंडीत होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.

मोहोळ (सोलापूर) : शहरामध्ये ऐन उन्हाळ्यात महावितरणच्या विजेने लपंडावाचा खेळ मांडला असुन त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिंकाना या विजेच्या चालू बंद होण्याच्या या नित्य प्रकाराने  अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

शहरामध्ये लाईट येण्या-जाण्याचे  कोणतेही वेळापत्रक राहिले नसून दर पाच दहा मिनीटांने विजेचे प्रवाह चालू बंद होतो. दिवसा अथवा रात्री लाईट बंद झाल्यास महावितरणच्या कार्यालयातील दूरध्वनी काढुन ठेवला जातो, अथवा व्यस्त दाखविला जातो व अशा विद्युत प्रवाहाच्या खंडीत होण्याची कारणे विचारल्यास "काम चालू आहे" असे मोघम उत्तर दिले जाते.

विजेच्या कमी जास्त विद्युत प्रवाहामुळे अनेक संगणकांना व त्याच्या इलेक्ट्रॉनीक साहित्याला शहरामध्ये हानी पोहचली आहे. व्यापारी पेठ, रुग्णालये, शासकीय कार्यालये यासह सर्व सामान्य नागरीक विजेच्या अनियमीत पणामुळे हैराण झाले आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार होणाऱ्या या समस्येचा तज्ज्ञ अभियंत्याकडुन निपटारा करून विजेचे प्रवाह त्वरीत नियमीत करावा. अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधुन होत आहे. 

Web Title: demand for regular electric supply by mohol citizens