देशमुखांच्या जोडीला बनसोडे ऐवजी साबळे 

Deshmukh's relationship with Sabale
Deshmukh's relationship with Sabale

सोलापूर : जिल्ह्याला देशमुखांच्या रूपाने दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याचबरोबर सोलापूर लोकसभेचे प्रतिनिधित्व भाजपचे खासदार शरद बनसोडे हे करतात. पण, खासदार अमर साबळे आगामी लोकसभा निवडणूक सोलापुरातून लढण्याची चर्चाही सध्या सुरू आहे. याला पुष्टी देणाऱ्या गोष्टी घडत आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दोन देशमुखांच्या जोडीला खासदार शरद बनसोडे यांच्याऐवजी खासदार अमर साबळे यांची छबी असलेले फलक सोलापुरात सगळीकडे झळकू लागल्याने राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दिल्ली येथील सांसा फाउंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने सोलापुरात 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत 'शायनिंग महाराष्ट्र 2018 या महाप्रदर्शना'चे आयोजन केले आहे. दिल्ली येथील या संस्थेच्या आयोजनाला खासदार साबळे यांनी पाठिंबा दिला आहे. नव्हे, त्यांच्या संकल्पनेतूनच हे प्रदर्शन सोलापुरात होत आहे. हे प्रदर्शन विकासाच्या वाटेवर आपला भारत अंतर्गत "आपले सरकार आपल्या योजना' हा विषय घेऊन मागील चार वर्षात केंद्र व राज्य सरकारने कोणकोणत्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्याची माहिती यातून लोकांना मिळणार आहे. हेरिटेज येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत तीन दिवस चालणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. 

या प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या बसवर त्याचबरोबर बस थांब्यावर जाहिराती झळकत आहेत. त्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अमर साबळे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची छायाचित्रे झळकत आहेत. मात्र, त्यामध्ये विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे छायाचित्र दिसत नाही. हे प्रदर्शन खासदार साबळे यांच्या पुढाकारातून होत असल्याने श्री. बनसोडे यांचे छायाचित्र नसल्याचे बोलले जाते. मुळात श्री. साबळे हे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा जोर धरत असल्यामुळेच हे प्रदर्शन सोलापुरात घेतल्याचेही बोलले जाते. दिल्लीच्या सांस फाउंडेशन या संस्थेने यापूर्वी तीन ठिकाणी अशाप्रकारची प्रदर्शने केली असल्याचेही सांगण्यात आले. प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या फलकावर ठळक अक्षरात मोबाईल नंबरही झळकत आहे. तो मोबाईल नंबर प्रगती मल्टिमीडिया या इव्हेन्ट कंपनीचा असल्याचेही सांगण्यात आले. एकूणच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्यादृष्टीने खासदार साबळे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे खासदार बनसोडे समर्थकांच्या भुवया निश्‍चितच उंचावल्या आहेत. 

कही पे निगाहे, कही पे निशाने 
मागील काही महिन्यांपासून खासदार साबळे यांनी सोलापूरचे दौरे वाढविले आहेत. माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळेच मला यावे लागते, असे जरी खासदार साबळे सांगत असले तरी या महाप्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांचे 'कही पे निगाहे, कही पे निशाने' असल्याचे स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com