मुख्यमंत्र्यांची तासगाव, इस्लामपुरात आज सभा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

तासगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 22) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तासगाव आणि इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या दोन सभा होणार आहेत. दुपारी 2 वाजता तासगाव, तर सायंकाळी 6.30 वाजता इस्लामपूरमध्ये सभा आहे.

तासगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 22) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तासगाव आणि इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांच्या दोन सभा होणार आहेत. दुपारी 2 वाजता तासगाव, तर सायंकाळी 6.30 वाजता इस्लामपूरमध्ये सभा आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिली मोठी निवडणूक जिल्ह्यात होत आहे. त्यात भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तासगाव आणि इस्लामपूर या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीशी लढत होत आहे. तासगावमध्ये थेट भाजपच्या चिन्हावर तर इस्लामपूरमध्ये आघाडी करून भाजप लढत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे भाजपला बळ मिळणार का, याकडे आता लक्ष असणार आहे.

तासगावमध्ये खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. ही सत्ता कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तेथे दुपारी सव्वाएकला ते अक्कलकोटहून तासगावला निघतील. दुपारी 2.15 वाजता वंदे मातरम्‌ चौकात सभा होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार पाटील, आमदार विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.

तासगावमधून सभेनंतर ते हेलिकॉप्टरने साताऱ्याला जातील. तेथील सभा झाल्यानंतर सायंकाळी ते इस्लामपूरला निघतील. सायंकाळी 6.50 वाजता यल्लम्मा चौकात सभा होणार आहे. तेथे विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला आव्हान देण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्यासमोर कडवी लढत उभी करण्यात यश आलेल्या आघाडीला मुख्यमंत्र्यांच्या सभेने बुस्टर मिळणार का, याकडे लक्ष असणार आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत तेथे नेतृत्व करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री खोत यांच्या मुलाच्या लग्नासाठी इस्लामपुरात आले होते. तेव्हा जयंतरावांकडे त्यांनी पाहुणचार घेतला होता. आता सभेत त्यांच्याविरुद्ध टोलेबाजी करताना ते दिसतील. त्याची इस्लामपूरकरांना उत्सुकता आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर  - "रॅगवीड' या विदेशी विषारी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. सूर्यफुलांच्या बिया व पक्षी खाद्यातून...

04.45 AM

मिरज - बाप्पाच्या जल्लोषी स्वागतासाठी सराफ बाजारही सज्ज झाला आहे. गणेशाच्या अकरा दिवसांच्या आराधनेत त्याला सजवण्यासाठी-...

04.33 AM

कोल्हापूर - मनपा शिष्यवृत्तीचे आता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती असे नामकरण करण्यात आले आहे. शिष्यवृत्तीची रक्कमही दुप्पट...

04.03 AM