पंढरपूरः विठ्ठल मंदिरात पुजाऱयाकडून भाविकाला मारहाण

अभय जोशी
बुधवार, 17 मे 2017

पंढरपूरः श्री विठ्ठल मंदिरात आज (बुधवार) दर्शनासाठी आलेल्या भाविकाने दर्शन घेताना त्याच्या हातातील हार श्री विठ्ठलाच्या मूर्तीस घालण्यासाठी टाकला. तेंव्हा मूर्ती शेजारी उपस्थित असलेल्या मंदिर समितीचे पुजारी अशोक भणगे यांनी हार अडवून त्या भाविकाला माराहाण केली. ही घटना आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.

या घटनेची समजलेली माहिती अशी की, दत्तात्रय सुसे (रा. शेवगाव जि.अहमदनगर) हे त्यांच्या कुटुंबियांसह श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी श्री विठ्ठलासाठी सोबत फुलांचा हार हातात नेला होता. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर त्यांनी दर्शन घेऊन त्यांच्या हातातील हार श्री विठ्ठलाच्या मूर्तीला घालण्यासाठी मूर्तीकडे टाकला. तेंव्हा मूर्ती शेजारी मंदिर समितीचे पुजारी अशोक भणगे यांनी हार अडवून मूर्तीच्या दिशेने हार का टाकला असे म्हणून चिडून भाविक दत्तात्रय सुसे यांना श्रीमुखात भडकवून मारहाण करुन त्यांना शिवीगाळ केली. तेंव्हा सुसे कुटुंबियांनी हस्तक्षेप केला. भाविक सुसे यांच्या चेहऱ्यावर मारहाणीमुळे वण उमटले असून, त्यांनी या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात जाऊन पुजारी अशोक भणगे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.