...तर यांनी शिवाजी महाराज संघाचे म्हटले असते: मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

एका वाहिनीवर हुतात्मा राजगुरू हे संघाचे सदस्य होते यावर चर्चा सुरू होती. यांना काय बोलावे तेच कळत नाही. डॉ. आंबेडकर, वल्लभभाई पटेल हे संघाचे होते असे प्रचार संघातर्फे केले जात आहेत. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता म्हणून हा असा प्रचार केला जात आहे.

कोल्हापूर : तिरंग्याची पूजा न करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) स्वयंसेवक आता हुतात्मा आमचे आहेत असा दावा करत आहेत. बरे झाले संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराज संघाचे आहेत असे म्हटले असते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातून सुरवात झाली आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. हुतात्मा राजगुरु संघाचे होते असा दावा केला जात असताना धनंजय मुंडे यांनी संघ व भाजपला लक्ष्य केले. हा अपप्रचार आम्ही किती दिवस सहन करायचा? हे थांबवायचे आहे म्हणून हा हल्लाबोल असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, की एका वाहिनीवर हुतात्मा राजगुरू हे संघाचे सदस्य होते यावर चर्चा सुरू होती. यांना काय बोलावे तेच कळत नाही. डॉ. आंबेडकर, वल्लभभाई पटेल हे संघाचे होते असे प्रचार संघातर्फे केले जात आहेत. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता म्हणून हा असा प्रचार केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजून 15 पैसेही लोकांना मिळालेले नाही. आज निरव मोदीसारखे लोक बँकांचे पैसे पळवत आहेत. भाजपने जनतेला महागाईचे इंजेक्शन दिले मात्र जनतेला ते टोचलेही नाही. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली. यांच्याच 16 मंत्र्यांनी भ्रष्टाचारात महाराष्ट्र लुटला. माझे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, जर आम्ही दिलेले पुरावे खोटे असतील तर आम्हाला कोणत्याही चौकात फाशी द्या पण जर खरे असतील तर या मंत्र्यांना घरी पाठवा. नेसरीला ऐतिहासिक वारसा आहे. स्वराज्याचे शिलेदार प्रतापराव गुजर यांची ही भूमी आहे. युद्धाची ही भूमी आहे. त्यामुळे या परिसरात येऊन आम्हा सर्वांना एक प्रेरणा मिळाली.

Web Title: Dhananjay Munde criticize RSS and BJP hallabol mocha