माणगाव गटात राष्ट्रवादीत खदखद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

कोवाड - पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेतल्यामुळे माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी निर्माण झाली आहे. मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याकडे याबाबत नाराजीही व्यक्त केल्याने राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाला आहे. नाराजांची बंडखोरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी व भाजप युतीतर्फे माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या जागेसाठी इच्छुकांची संख्याही जास्त होती. त्यासाठी तालुक्‍यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अध्यक्षांकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी मागणी केली होती; पण त्याचा फारसा उपयोग न झाल्याने बंडखोरीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. या नाराज कार्यकर्त्यांची मतदारसंघात जोरदार चर्चा असून, विरोधी पक्षातील नेते त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. मतदारसंघात त्यांच्या बैठकाही झाल्याचे समजते.

पश्चिम महाराष्ट्र

माझ्या मंत्रीपदामुळेच त्यांना पोटशुळ; ...ती आत्मक्‍लेष यात्रा नव्हे सदाभाऊ द्वेष यात्रा सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून...

07.45 PM

सातारा - पावसाने लागोपाठ दगा दिला. पेरलेल्या पिकाला कोंबच फुटले नाहीत. घर, शेतावर काढलेलं कर्ज वाढत गेलं. बा सारखा इचारात असायचा...

11.15 AM

कऱ्हाड ः तालुक्यात स्वाइन फ्लूच्या रूग्णात वाढ होत आहे. त्यातच काल रात्री निगडी (ता. कऱ्हाड) येथील एकाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू...

10.51 AM