जिल्हा बॅंकेतील खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेत वर्ग करू नका - मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

कोल्हापूर - जिल्ह्याच्या सहकारात 77 वर्षांपासून कार्यरत व जिल्ह्यातील छोट्या संस्थांची मातृसंस्था असलेल्या जिल्हा बॅंकेतील खाती राष्ट्रीयीकृत बॅंकेकडे वळवू नका, असे कळकळीचे आवाहन बॅंकेतर्फे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकेतही पैशाचा खडखडाट आहे, निधी उपलब्धतेसाठी बॅंकेचे प्रयत्न सुरू असल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जिल्ह्यातील सहकार संस्थांची मातृसंस्था म्हणून 1938 पासून जिल्हा बॅंक ही "आपली बॅंक' म्हणून कार्यरत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या बॅंकेकडे पाहिले जाते. सहकारी संस्थांची उभारणी व सक्षमीकरणात या बॅंकेचा मोठा वाटा आहे. सहकार क्षेत्रापुढे जी आव्हाने येत आहेत, त्याचा सामना जिल्हा बॅंकेलाही करावा लागत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.
नोटबंदी निर्णयामुळे देशात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. आमच्या बॅंकेला चेस्ट करन्सी बॅंकेकडून पर्याप्त चलनपुरवठा होत नाही.

याबाबत बॅंकेच्या वतीने 5 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय व त्या बॅंकांवर मोर्चा काढून परिस्थिती सांगितली आहे. देशातील सर्वच बॅंकांकडे अपुरा चलन पुरवठा होत आहे. सद्यस्थिती पूर्वपदावर येण्यास काही काळ लागेल. तत्पूर्वीच काही दूध संस्था व इतर संस्था राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे जाणार असल्याच्या बातम्या वृत्तपत्रातून येत आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांतही निधीची कमतरता आहे. तरी सर्व सहकारी संस्था, खातेदार, यांनी आपली खाती अन्यत्र उघडू नयेत. बॅंकेस पुरेसे चलन नियमित प्राप्त होण्यासाठी बॅंकेचे युध्दपातळीवर कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, म्हणून बॅंका व खातेदारांनी आमच्याकडील व्यवहार कायम ठेवावेत, असे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव :  सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही, असे उर्मट उत्तर...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणी साठ्यात चोवीस तासांत ०.२१ टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणी साठा ८८.७५ टीएमसी झाला आहे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सांगली - स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रतिक्विंटल वितरण कमिशनमध्ये दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. सध्या प्रतिक्विंटलसाठी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017