जिल्हा परिषद. पंचायत समिती निवडणुकीत तरुणांना संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

मिरज - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तरुणांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्‍यातून पक्षाला बहुमत मिळेल, असा विश्‍वास राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त झाला. युवक राष्ट्रवादीचे तालुक्‍यातील कार्यकर्ते, ग्रामपंचायत व सोसायट्यांचे पदाधिकारी यांची बैठक येथील मोहनराव शिंदे दूध संघात झाली. युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम नागरगोजे, तालुका निरीक्षक संदीप पाटील, गंगाधर तोडकर उपस्थित होते.
 
श्री. लाड म्हणाले, ‘जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिबीर 23 आणि 24 ऑगस्टला गणपतीपुळे येथे आहे. त्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. मिरज तालुक्‍यात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध सतरा आघाड्या करणार आहोत. महिला, युवती, तरुण, संघटना, वाहतूक अशा विविध सेलमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. कोणताही राजकीय वारसा न तपासता कामाच्या बळावर निवडी होतील.‘‘ श्री. इनामदार म्हणाले,""युवकांना संधी देण्याचे पक्षाचे तत्त्व आहे. तरुणांना निवडणुकांत चांगली संधी आहे. आतापासूनच संपर्क वाढवावा. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा निश्‍चित फडकेल. तालुका भाजपमुक्त करण्याचा निर्धार आहे. मतदारसंघातील समस्यांकडे भाजप लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. त्यांच्याविषयीची नाराजी निवडणुकांत दिसेल.‘‘

प्रवीण कांबळे, रावसाहेब नलवडे, रुपेंद्र जावळे, महावीर खोत, स्वप्नील कोरे, मजनू कांबळे, मनोज तोरे, अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.