सातारी ज्ञानशिदोरीने गडचिरोलीकर तृप्त

विशाल पाटील
सोमवार, 23 एप्रिल 2018

सातारा - आयपीएस अधिकार म्हणजे करारी, मग त्याचे भले-बुरे अनुभव असतात. तरीही याच अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले तर निश्‍चित समाजात आमूलाग्र बदल होतो. येथील पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुष्पगुच्छ स्वीकारण्याऐवजी स्वागताला पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले अन्‌ त्यातून तब्बल दहा हजार ६०० पुस्तके भेट मिळाली. तीच पुस्तके नक्षलग्रस्त गडचिरोलीला पाठविण्यात आल्याने तेथे ज्ञानगंगा वाहू लागली आहे. 

गडचिरोली येथे पोलिस अधीक्षक असताना संदीप पाटील हे नक्षलग्रस्त आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी, या ध्येयाने झपाटले होते. नक्षलवाद्यांच्या दहशतीमधील लोकांना मूळ प्रवाहात जोडण्यासाठी ज्ञानाची क्रांती घडविणारे प्रयोग सुरू केले. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून तेथे पोलिस स्टेशन, ग्रंथालयांत पुस्तके उपलब्ध करून दिली. युवकांवर योग्य संस्कार व्हावेत, त्यांच्या ज्ञानात वाढ व्हावी, यासाठी त्यांनी पोलिसी काम करत ग्रंथालये सुरू केली. परिणामी हे युवक नक्षलवादापासून दूर राहण्यास मदत होऊ लागली. 

साताऱ्याचे पोलिस अधीक्षक झाल्यानंतर श्री. पाटील यांनी पुष्पगुच्छऐवजी पुस्तके भेट देण्याचे आवाहन केले. त्याला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल दहा हजार ६०० पुस्तके भेट दिली. राज्य-देशाचा इतिहास, महापुरुषांचे चरित्र, भौगोलिक, धार्मिक, विज्ञान, साहित्य, कादंबऱ्या, कवितांसह लहान मुलांसाठीची पुस्तकेही मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पुस्तके गडचिरोलीला सुपूर्द केली. दुर्गम भागातील पोलिस ठाण्यात तसेच ३३ वाचनालयांत ही पुस्तके उपलब्ध करण्यात आली.

Web Title: dnyanachi shidori van gadchiroli