कर्नाटकी दडपशाहीला घाबरणार नाही - पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

बेळगाव - लढण्याचा हक्क आहे, हक्कांसाठी लढतोय, तुमच्याकडे कायदा आणि शस्त्र आहे. त्यामुळे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आमच्या मनात लढण्याची इच्छा आहे, तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. आजही हुकूमशाही आणि दंडूकशाहीला झेलण्याची ताकद येथील मराठी माणसाच्या निधड्या छातीत आहे. मराठी माणूस कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही, असे प्रतिपादन सीमालढ्यातील अग्रणी नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.

येथील व्हॅक्‍सीन डेपो मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. एन. डी. पाटील बोलत होते. शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यासह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि आमदार उपस्थित होते. पाटील म्हणाले, अनेक वर्षांचा लढा असून जनतेचा विजय होऊ नये हे कोणी नाकारू शकत नाही. कर्नाटक सरकारचे आणि पोलिसांचे अनेक अत्याचार, छळ मराठी माणसाने पचविले आहेत. लोकशाहीवर देश चालतो आहे. या ठिकाणी हुकूमशाही करता येणार नाही. सरकारला लोकशाहीची लाज असेल तर अन्याय करू नये. सडक्‍या मनोवृत्तीने सरकार चालवून काही यशस्वी होणार नाही. उलट दिवाळखोरीत निघणार आहे. याचा विचार कर्नाटक सरकारने केला पाहिजे.''

या वेळी आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, शहर अध्यक्ष दीपक दळवी, बेळगाव तालुका अध्यक्ष निंगोजी हुद्दार, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महामेळाव्याला सीमाभागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर - हवामानाधारित फळपीक विमा योजनेमध्ये डाळिंब पिकासाठी 2015-16 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा...

03.33 AM

सांगली - जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याजवळील चंदनाची तीन झाडे चोरीस गेल्याच्या शोधासाठी पोलिस पथके आरोपीच्या शोधासाठी...

02.57 AM

ताकारी - कऱ्हाड-तासगाव रस्त्यावर एवढी रहदारी नाही. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे योग्य नाही. नागरिकांची घरे, दुकाने...

02.54 AM