एक्‍स्प्रेस फीडरची दुरुस्ती मिटेना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

दर मंगळवारी सांगलीकरांचा पाणीपुरवठा ठप्‍प झाल्‍याने वणवण

सांगली - कृष्णा नदीतील महापालिकेच्या उपसा केंद्राला वीज पुरवठा करणारे एक्‍स्प्रेस फीडरच्या दुरुस्तीच्या नावाखाली दर मंगळवारी वीज बंद ठेवण्यात येते. त्यामुळे पाणी उपसा होत अख्खा दिवस शहरात पाणीपुरवठा ठप्प होत आहे. ऐन दिवाळीतही पाण्याचा ठणठणाट सांगली शहरात होता.

दर मंगळवारी सांगलीकरांचा पाणीपुरवठा ठप्‍प झाल्‍याने वणवण

सांगली - कृष्णा नदीतील महापालिकेच्या उपसा केंद्राला वीज पुरवठा करणारे एक्‍स्प्रेस फीडरच्या दुरुस्तीच्या नावाखाली दर मंगळवारी वीज बंद ठेवण्यात येते. त्यामुळे पाणी उपसा होत अख्खा दिवस शहरात पाणीपुरवठा ठप्प होत आहे. ऐन दिवाळीतही पाण्याचा ठणठणाट सांगली शहरात होता.

भारनियमन काळात पाणीपुरवठा करणारी यंत्रणा चालू रहावी यासाठी महापालिकेने एक्‍स्प्रेस फीडरची व्यवस्था केली. त्यासाठी अडीच कोटींचा खर्च झाला. परंतु त्याचा काहीच फादा होईना, अशी गत आहे. दर मंगळवारी शहरात पाण्याचा ठणठणाट होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली एक्‍स्प्रेस फिडर बंद ठेवले जातात. त्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडत असून नागरिकांना  टंचाईला सामोरे जावे लागते आहे. महावितरणचा खेळखंडोबा आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांचा त्रेधा उडत आहे. दरम्यान, आज आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पाणीपुरवठा अधिकारी शीतलनाथ उपाध्ये यांच्याकडून माहिती घेतली असता, तेही याबाबत अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आयुक्तांनी थेट महावितरणच्या अभियंत्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधाला. पुढच्या मंगळवारपासून एक्‍स्प्रेस फीडर बंद ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. 

अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा... 
आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी एक्‍स्प्रेस फीडरची माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यास दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी ते अधिकारी म्हणाले,‘‘साहेब मी महावितरणच्या अमुक अधिकाऱ्यांशी सकाळीच बोललोय.’’ त्या अधिकाऱ्यांचे नाव ऐकून आयुक्तांना अश्‍चर्याचा धक्का बसला. कारण ते अधिकारी चार महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहे. अधिकाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा किती आहे ? हे यावरूनच स्पष्ट होते.

पश्चिम महाराष्ट्र

सांगली - मुंबईत नऊ ऑगस्टला काढण्यात आलेल्या मोर्चाला सरकारने दिलेल्या आश्‍वासनांचा पाठपुराव सुरूच राहणार आहे. मराठा समाजाला...

05.00 AM

शालेय खेळ महासंघाचा निर्णय : खेळाडूंवर करडी नजर, यंदापासून अंमलबजावणी...

04.45 AM

विधायकतेतून समृद्ध गाव : डॉल्बीलाही दिला फाटा पुनाळ - समृद्ध गावासाठी जे...

04.36 AM