आज सन्मान रुग्णसेवेचा...

doctor
doctor

मुंबई, पुण्यानंतर सांगली, मिरजेची 'मेडिकल हब' अशी ओळख निर्माण झाली आहे. येथील वैद्यकीय परंपरेला दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. आजही ही ओळख टिकवून ठेवण्यात आणि तिचा नावलौकिक वाढवण्यात येथील डॉक्‍टरांचे मोठे योगदान आहे. व्यवसायासोबतच समाजसेवेचा वारसाही डॉक्‍टरांनी जपला आहे. त्यांच्या या सेवेचा आणि  कार्याचा प्रातिनिधिक सन्मान करण्याचा उपक्रम 'सकाळ माध्यम समूहा'ने सुरू केला आहे. यंदाच्या सन्मानमूर्ती डॉक्‍टरांचा थोडक्‍यात परिचय....

‘मिरॅकल लाईफ सायन्सेस’चे सहकार्य
विटा येथील बुधवाणी ब्रदर्स यांच्या मिरॅकल लाईफ सायन्सेस या औषध निर्माण कंपनीचे सहकार्य या कार्यक्रमास लाभले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात कंपनीचा नावलौकिक आहे. श्री राजलक्ष्मी मेडिकल आणि कन्स्ट्रक्‍शन ग्रुप या माध्यमातून कार्यकारी संचालक डॉ. शंकरशेठ बुधवाणी यांनी सन २००० पासून या व्यवसायात प्रवेश केला आहे. फार्मसी विषयातून  पीएच.डी. मिळवणारे ते सांगलीतील पहिलेच फार्मसी व्यावसायिक आहेत. श्री राजलक्ष्मी होलसेल व रिटेल औषध विक्री व्यवसायाबरोबरच औषध निर्माण क्षेत्रात काम करत आहेत.

डॉ. बिंदुसार पलंगे (एम. डी. मेडिसीन) - मूळचे सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील असलेले डॉ. पलंगे यांनी मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर 
तेथेच लेक्‍चरर म्हणून सेवा केली. सन २०१३ पर्यंत शासकीय रुग्णालयात ते कार्यरत होते. वडिलांकडून सेवादलाचा वारसा  त्यांच्याकडे आला आहे. त्याच सेवाभावी वृत्तीने आजही ते रुग्णसेवा करत आहेत.

डॉ. आर. आर. भोई (एम. डी.) - मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. सध्या वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर येथे कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, पेठ येथे सेवा करत असताना राजीव गांधी अभियान व संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याने जिल्ह्यात पेठ आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांक मिळाला. राज्य पातळीवरील कायाकल्प योजनेंतर्गत २०१७-१८ चा डॉ. आंनदीबाई जोशी पुरस्कार त्यांनी इस्लामपूर  रुग्णालयाला मिळवून दिला.

डॉ. संदीप देवल (आयुर्वेदतज्ज्ञ) - नाशिक विद्यापीठातून आयुर्वेदातून एमडी उत्तीर्ण केले. कर्करोगासह विविध आजारांवर गेली अनेक वर्षे आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार करत आहेत. आयुर्वेदाच्या प्रसारासाठी वीसहून अधिक देशांत प्रवास केला आहे. त्यांना विविध पुरस्कार व सुवर्णपदकांनी गौरवले आहे. इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर, हंगेरी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, सर्बिया आदी देशांतील परिषदांत शोधप्रबंध सादर केले आहेत. अमेरिकन संशोधन संस्थेचे मानद सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आले आहे.

डॉ. मुकुंदराव ऊर्फ रामचंद्र नरसिंह पाठक (एम. एस.) - वैद्यकीय आणि सामाजिक सेवा करणारे डॉक्‍टर म्हणून ओळख असलेले डॉ. मुकुंदराव पाठक. अनाथ अर्भकालय, अनाथ बालकाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रमासह वसंतदादा पाटील रक्तपेढी आणि रक्तविकार संशोधन केंद्र, नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड, जिल्हा योग परिषद, मिरज विद्यार्थी संघ यासह अनेक सेवाभावी संस्थांचा व्याप सांभाळणारे डॉक्‍टर म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. शासनाच्या समितीवरही सदस्य म्हणूनही  कार्यरत आहेत.

डॉ. प्रभाकर पाटील (स्त्रीरोग तज्ज्ञ) - सोलापूरच्या डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सन १९९४ पासून शिराळा येथे वैद्यकीय सेवा सुरू केली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिराळा शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. इस्लामपूर स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून ‘अंनिस’च्या माध्यमातून समाजात अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात जागृती करण्याचे काम करत आहेत.

डॉ. सपना तिप्पाणावर (कॉस्मेटोलॉजिस्ट) - सांगलीत एस. तिप्पाणावर स्कीन केअर सेंटरच्या माध्यमातून गेली दीड दशके प्रॅक्‍टिस करत आहेत. भारतात व परदेशांत सौंदर्यशास्त्रातील नवनवीन लेसर तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. सांगलीत प्रथमच कॉस्मेटिक उपचारपद्धती सुरू केली. सांगलीबरोबरच पुण्यातही त्यांनी आता सेवा सुरू केली आहे. आजच्या प्रदूषणाच्या माऱ्यातही त्वचेचे सौंदर्य कसे टिकवावे यावर त्यांनी विविध ठिकाणी मोफत शिबिरे घेऊन मार्गदर्शन केले आहे.

डॉ. चंद्रशेखर परांजपे (एम.बी.बी.एस., बी. ए. एम. एस.) - जुन्या पिढीतील नामवंत डॉक्‍टर. गेली ४२ वर्षे वैद्यकीय सेवेचे काम करत आहेत. आजोबा ग. पां. परांजपे यांनी सुरू केलेल्या कुमार औषधालय संस्थेमार्फत गेली ७० वर्षे गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत औषधोपचार करतात. केसपेपर फी घेत नाहीत. रेकी : जीवन संजीवनी, रेकी : एक अमोल विद्या आणि बाळाची कवचकुंडले ही तीन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  ज्येष्ठ नागरिक संघाचेही काम करतात.

डॉ. रियाज मुजावर (हृदयरोगतज्ज्ञ) - मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर त्यांनी कॉर्डिओलॉजीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ओहीयो (अमेरिका) येथील फेलोशिपही पूर्ण केली आहे. कॉर्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, अमेरिकन हार्ट असोसिएशनचे ते सदस्य आहेत. बेंगळुरूच्या सत्य साई इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना चार वर्षांत एक हजारांहून अधिक क्‍लिष्ट हृदयशस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरीत्या  केल्या. शिशूंवरील हृदयशस्त्रक्रियेतही ते पारंगत आहेत.

डॉ. गणेश यमगर (बी. ए. एम. एस.) - भिवघाट हे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. या परिसरात असणारी सुसज्ज हॉस्पिटलची गरज लक्षात घेऊन आपल्या सामाजिक कार्याला मूर्त स्वरूप देण्याच्या इच्छेतून डॉ. गणेश तातोबा यमगर यांनी दोन वर्षांपूर्वी भिवघाट येथे श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड आयसीयूची स्थापना केली. यामुळे हृदयरोगग्रस्तांवर, अपघातग्रस्तांवर वेळेवर उपचार मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे. आरोग्य शिबिरातून गरिबांवर मोफत उपचार केले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com