इचलकरंजीत पिसाळलेल्या कुत्र्यांने घेतला सहा बालकांचा चावा

इचलकरंजीत पिसाळलेल्या कुत्र्यांने घेतला सहा बालकांचा चावा

इचलकरंजी - पिसाळलेल्या कुत्र्यांने एका युवतीसह सहा बालकांचा चावा घेतला. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मलाबादे चौक परिसरात ही घटना घडली.

घरगुती गणरायाची मुर्ती आणण्याची लगबग सुरु असतांना ही घटना घडल्याने पालकांची तारांबळ उडाली. सर्व बालकांना तातडीने आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

चावा घेतलेल्या बालकांची नावे अशी, अमृता शिवाजी हत्तीकर (वय 6, रा.जयभिमनगर), अनुष्का महेश माने (3, नारायणनगर), ऋषीकेश सुरेश माने (7, नारायणनगर), ओम युवराज दिवटे (11, मुक्त सैनिक वसाहत), श्रेयश जगन्नाथ धोंगडे (6, विक्रमनगर), सनी संपत पाटील (10, विक्रमनगर) व काजल आप्पासो आवळे (23, आवळे गल्ली). 

घरगुती गणपती आणण्यासाठी नागरिक आपल्या मुलांसह मलाबादे चौक परिसरात आले होते. तेथे पिसाळलेल्या एका कुत्र्यांने अचानक चावा घेण्यास सुरुवात केली. दिसेल त्या बालकांना चावा घेत कुत्र्यांने मलाबाद चौक, अडत पेठ परिसरात कांही वेळात धूमाकूळ घातला. तब्बल सातजणांना हे कुत्रे चावल्याने परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com