कुत्रे चावले, इंजेक्‍शन हवे आहे,आधी ऍडमिट व्हा 

कुत्रे चावले, इंजेक्‍शन हवे आहे,आधी ऍडमिट व्हा 

कोल्हापूर - कुत्रे चावल्यानंतर जखमेभोवती इंजेक्‍शन घ्यायचे असल्यास संबंधित रुग्णास ऍडमिट होण्याच्या सीपीआर प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.अवघ्या दहा रूपयात इंजेक्‍शन देण्याची सीपीआरची ख्याती आहे. खुल्या बाजारात याच इंजेक्‍शनची किंमत 390 रूपये इतकी आहे. 

भटक्‍या तसेच पाळीव कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहता ती चावल्यानंतर इंजेक्‍शनसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दररोज दहा ते पंधरा जणांवर उपचार होतात. 

कसबा बावडा येथील झूम प्रकल्पामुळे लाईन बाजारसह प्रकल्प परिसरातील नागरिकांचे जगणे भटक्‍या कुत्र्यांमुळे मुश्‍कील झाले आहे. कुत्रे चावले की इंजेक्‍शनसाठी सीपीआर असे पूर्वीपासून गणित आहे. अलीकडे खासगी डॉक्‍टरांकडे इंजेक्‍शन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली तरी दुर्गम भाग, खेड्यापाड्यातील शहरातील गोरगरीब लोकांसाठी सीपीआरच आज एकमेव आधार आहे. कुत्र्याचे नुसतेच दात उमटले आहेत की त्याच्या चावण्यामुळे जखम झाली आहे, यावर उपचार ठरतात. आठवड्यातून एकदा अशी पाच इंजेक्‍शन दिली जातात. इंजेक्‍शन घेतले की त्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. कुठल्याही रुग्णाची इंजेक्‍शन दिले की पळ काढण्याची मानसिकता असते.मात्र एखाद्याने पथ्य न पाळल्यास त्यातून काही धोका निर्माण झाल्यास पुन्हा नातेवाईक सीपीआरच्या नावानेच ओरडतात.त्यामुळे जखमेच्या भोवती इंजेक्‍शन देण्यासाठी संबंधित रुग्णाने किमान तीन दिवस ऍडमिट होण्याची अट घातली गेली आहे. 

संबंधित रुग्ण देखरेखीखाली राहतो आणि ऍडमिट असल्याने पथ्यही पाळतो अशी या मागील धारणा आहे. 

इंजेक्‍शन दिल्यानंतर त्याची रिऍक्‍शन येऊ शकते. त्यातून अन्य काही धोका होऊ नये, यासाठी ऍडमिट होणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कुत्रे चावल्यानंतर बाहेरही इंजेक्‍शन मिळते मात्र एका इंजेक्‍शनची किंमत 390 रूपये इतकी आहे. पाच इंजेक्‍शन घ्यायचे म्हंटले तरी साधारणतः दोन हजारांच्या घरात हा खर्च जातो. सीपीआरमध्ये इंजेक्‍शन केवळ दहा रूपये आणि ऍडमीटचे वीस असे तीस रूपये घेऊन उपचार केले जातात. 

भटक्‍या कुत्र्यांबरोबर वेगवेगळ्या जातीची अन्य कुत्री पाळण्याचा ट्रेंड कोल्हापुरात आला आहे. कुत्र्याचा आकार पाहिला की अंगावर काटा उभा राहावा अशी स्थिती आहे. कुत्री खासगी असल्यामुळे संबंधित मालकाने इंजेक्‍शन व अन्य औषधपचाराची काळजी घेतलेली असते. मात्र सर्वानाच याची माहिती असते असे नाही. पाळीव कुत्रे चावले तरी इंजेक्‍शनसाठी जावे लागते. 

कुत्रे चावले तर उपचार हवेतच 
पूर्वी कुत्रे चावले की गावठी औषधांवर भर दिला जायचा. कुत्र्याचे चावणे ही साधी बाब नसून वेळीच उपचार न घेतल्यास जीवावरही बेतू शकते, हे ध्यानात आल्यानंतर हल्ली कुत्रे चावले म्हंटले की उपचार घ्यायचेच अशी मानसिकता झाली आहे. कुत्रे कोणतेही असो ते चावले आणि त्याची लाळ रक्तात मिसळली की "रेबीज' चा धोका निर्माण होता. हेच रुग्णाच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे जखमेभोवती इंजेक्‍शन द्यायचे झाल्यास किमान तीन दिवस आणि जखम मोठी असल्यास अधिक दिवस ऍडमिट व्हावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com