‘उत्तरेश्‍वर’ची डॉल्बीमुक्त शिवजयंती मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

कोल्हापूर - येथील उत्तरेश्‍वर पेठेतील ८०हून अधिक तरुण मंडळे, तालीम संस्था आणि महिला बचत गटांच्या वतीने यंदाही संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे. डॉल्बीमुक्त शिवजयंती मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम ठेवत विविध सामाजिक उपक्रमावर भर दिला जाणार असल्याची माहिती आज उत्सव समितीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, किशोर घाटगे, दीपक घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान, उद्या (मंगळवारी) दुपारी साडेबारा वाजता ‘चिमण्या वाचवा - पक्षी वाचवा’ या उपक्रमाने उत्सवाला प्रारंभ होईल. चिमण्यांसाठी जलपात्र, घरटी आणि खाद्य वितरण या वेळी होईल.

किशोर घाटगे म्हणाले, ‘‘शिवजयंती उत्सव समितीने घटनेतच डॉल्बीमुक्त शिवजयंतीचा ठराव केला आहे. त्यामुळे यंदाही पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतकऱ्यांसाठीचे निर्णय या मध्यवर्ती संकल्पनेवर फलक उभारले जाणार असून ते मिरवणुकीतही असतील. धनगरी ढोल, झांजपथक, बेंजो अशा पारंपरिक वाद्यांसह लवाजमा आणि मर्दानी खेळ, टाळ-मृदंगासह वारकऱ्यांचा सहभाग यंदाच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल.’’ बुधवारी (ता. २६) सकाळी प्रबोधनात्मक फलकांचे उद्‌घाटन, सायंकाळी साडेसात वाजता परिसरातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी खाद्य महोत्सव आणि रात्री आठ वाजता शिवकालीन राजमहालाचे उद्‌घाटन होईल. गुरुवारी (ता. २७) बालमित्रांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा होतील. त्यानंतर शिवजयंती उत्सव मंडळांसह विविध तालीम संस्था, तरुण मंडळांसाठी पान-सुपारी कार्यक्रम होईल. रात्री साडेआठ वाजता परिसरातून भव्य मशाल फेरी होईल. शुक्रवारी (ता. २८) सकाळी शिव जन्मकाळ सोहळा आणि सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक होईल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला प्रशांत संकपाळ, सुरेश कदम, जयदीप भोसले, संदीप सुतार, किशोर माने, रमाकांत आयरेकर, अजिंक्‍य चित्रुक, जलराज कदम, युवराज जाधव, अनिकेत भोसले आदी उपस्थित होते. 

पन्हाळगडाची स्वच्छता
शिवजयंती सोहळ्यानंतर परिसरातून पाचशेहून अधिक तरुण पन्हाळगडावर जाऊन गडाची स्वच्छता करणार आहेत. त्याशिवाय मिरवणुकीची परंपरेप्रमाणे रात्री दहापर्यंत सांगता केली जाणार आहे.