घरगुती वीजचोर ग्राहकांना विद्युत मंडळाचा "शॉक' 

घरगुती वीजचोर ग्राहकांना विद्युत मंडळाचा "शॉक' 

बिजवडी - वीज वितरणच्या दहिवडी उपविभागाने घरगुती वीजचोरीला आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवली. माण तालुक्‍यातील 225 घरगुती ग्राहकांना वीजचोरी करताना पकडले आहे. त्यांच्याकडून 24 लाख पाच हजार 507 रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यातील सहा जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पी. बी. वाघ यांनी ही माहिती दिली. वीज वितरण उपविभागाची गळती 30 टक्के झाल्याने भारनियमनाची शक्‍यता वाढली आहे. गळती आटोक्‍यात आणण्यासाठी कार्यकारी अभियंता अरविंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी उपविभागांतर्गत घरगुती वीजचोरी प्रकरणी धडक मोहीम राबवली होती. त्यात 225 ग्राहक वीजचोरी करताना सापडले. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला. 

माण तालुक्‍यात वीजचोरीचे प्रमाण वाढले असून, त्या विरोधात वीज वितरणने कडक पाऊले उचलली आहेत. वीज चोरी सापडल्यास फौजदारी दाखल होण्याबरोबरच मोठ्या दंडात्मक कारवाईलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे ग्राहकांनी विजेचा जपून वापर करावा; पण वीजचोरी करू नये, असे आवाहनही उपकार्यकारी अभियंता पी. बी. वाघ, कनिष्ठ अभियंता श्री. देशमुख यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com