डॉ. माशेलकरांना "दाभोलकर पुरस्कार'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा पालिकेतर्फे दिला जाणारा "डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार‘ प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना आज जाहीर करण्यात आला. 25 सप्टेंबरला पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या रविवारी सायंकाळी सहा वाजता शाहू कलामंदिरात पुरस्काराचे वितरण होईल. नगराध्यक्ष विजय बडेकर, नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

ते म्हणाले, ""डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची स्मृती म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. रविवारी होणाऱ्या समारंभात ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.‘‘ या वेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल, डॉ. हमीद दाभोलकर, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.‘‘

गोव्यातील माशेल गावात डॉ. माशेलकर यांचा जन्म झाला. बालपण मुंबईत गेले. तेथील पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी त्यांचे आयुष्य घडवले. "भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राला डॉ. माशेलकर यांनी खंबीर नेतृत्व दिले आणि "सीएसआयआर‘सारख्या संस्थेचा त्यांनी कायापालट केला. हळद आणि बासमती तांदूळ यांचे बौद्धिक संपदा हक्क परत मिळविण्यात डॉ. माशेलकर यांचे मोठे योगदान आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना यापूर्वी पद्‌मश्री, पद्‌मभूषण व 2014 मध्ये पद्‌मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.