शहरवासीयांच्या घराची स्वप्नपूर्ती होईना 

Dream of Own home not complete
Dream of Own home not complete

सोलापूर : 2017-18 ते 2022 पर्यंत राज्यातील 382 महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 19 लाख 40 हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामधील 2017-18 या वर्षासाठी सहा लाख 30 हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी एकही घरकूल पूर्ण झाले नसून उद्दिष्टातील फक्‍त एक लाख दोन हजार घरकुलांची कामे सुरू आहेत. वर्षानंतरही शहरवासीयांच्या घरांची स्वप्नपूर्ती होईना, असे चित्र पाहायला मिळत आहे.

हाताला काम आहे परंतु, रहायला निवारा नाही, अशी अवस्था शहरातील गोरगरीब नागरिकांची झाली आहे. राज्यातील बहुतांशी नगरपालिका, नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये 40 टक्‍के पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आवास योजना कागदावरून पुढे सरकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी शहरातील नागरिकांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्याकरिता मनुष्यबळ अपुरे, बायोमेट्रिक पद्धतीने लाभार्थी निश्‍चित करणे व त्यासाठी न परवडणाऱ्या खर्चात खासगी एजन्सी नियुक्‍त करणे, योजनेची नागरिकांना माहितीच नाही, बॅंकांचे असहकार्य यासह अन्य अडथळ्यांची शर्यत महापालिका, नगरपालिकांना पूर्ण करावी लागत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दोनच नगरपालिकांनी घरकूल बांधकामांचा आराखडा दिला आहे. उर्वरित नगरपालिकांना आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

- पंकज जावळे, नगर प्रशासन अधिकारी 

घरकुलाची स्थिती 

2022 पर्यंतचे उद्दिष्ट 

19.40 लाख 
(2017-18) 

उद्दिष्टे 

6.30 लाख 

पूर्ण 

000 

बांधकाम सुरू 
1.02 लाख 

अपूर्ण 
5.28 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com