पाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल

drought
drought

सलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे. पावसाभावी विहीरीच्या तळावर गवत व काटेरी झुड़प उगवली आहेत. पाणीसाठा व्हावा या उद्देशाने खणलेले शेततलाव शोभेच्या वस्तु बनून राहिली आहेत. विंधन विहीरींची पाणी पातळी हजार फुटाच्या खाली गेली आहे. परिसरातील साठवण तलावात शेळया मेंढ्या चरताना दिसत आहेत. शेतीला पाणी तर सोडाच पण प्यायला पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने पशुधन कसायाच्या दावणिला बांधले जात आहे. आशा भयावह दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांचे जगने असहाय्य झाले आहे. त्यामूळे या गंभीर दुष्काळी परिस्थिची वेळीच दखल घेवून मायबाप सरकारने तातडीची मदत द्यायला हवी अशी मागणी दुष्काळी गावातून होत आहे.      

जनावराना चारा छावणीची गरज - तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुक्या जनावरांचे वैरणी अभावी खुप हाल होत आहेत. ज्वारिचा कडबा नसल्याने शेतकऱ्यांना तीन हजार रुपये टनाने ऊस विकत घ्यावा लागत आहे. ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांनी जनावरे विकायला काढली आहेत. उन्हाळा यायच्या आत जनावरांचे हे हाल पाहून शेतकरी हवालदील झाला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेला पशुधन व्यवसाय टिकवायचा असल्यास लवकरात लवकर चारा छावण्या चालू हाव्यात अश्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत.              

बागेला टँकरने पाणी - या परिसरातील शेतकरी गेल्या महिनाभरापासून डालिंबाच्या व द्राक्षांच्या बागांना टँकरने विकतचे पाणी घालु लागले आहेत. एका २० हजार लीटर क्षमतेच्या टेंकरला दोन ते अडीच हजार एवढे पैशे मोजावें लागत आहेत. त्यामूळे दरवर्शी प्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात अतिरिक्त वाढ होणार आहे. निघालेले उत्पन्न ओषधाच्या व पाण्याच्या खर्चावरच जाणार असल्याची परिस्थिती शेतकऱ्यांना जानवू लागली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com