पावसाअभावी जिरायत पिके करपू लागल्यामुळे शेतकरी चिॆतेत

crop
crop

मंगळवेढा : निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असणारी तालुक्यातील जिरायत पिकाची अवस्था पावसाने ओढ दिल्यामुळे वाईट झाली आहे. पावसाअभावी तालुक्यातील 18414 हेक्टर क्षेत्रातील पिके करपू लागली पिकाचे हाल बघवत नसल्याने शेतकऱ्यांचे भरल्या डोळयाने लक्ष आभाळाकडे लागले आहे. पण आकाशात फक्त ढगांची दाटी होत आहे. प्रत्यक्षात मात्र  बरसण्याची चिन्हे दिसत नाही.

उजनी लाभ क्षेत्रातील क्षेत्र वगळता इतर क्षेत्र पुर्णता निसर्गावर अवलंवून आहे. उजनी कालव्याला पाणी आल्यामुळे या भागातील ऊसशेतीला लाभ झाला असला तरी खरीप हंगामात असलेली बाजरी तुर सुर्यफुल बाजरी आदी पिकाची पेरणी मृग नक्षत्रातील पावसावर केली. भाळवणीतील शेतकऱ्याला तर सुर्यफुलाचे बियाणे बनावट निघाल्याने दुबार पेरणी करावी लागली. पण पिकाची जोपासना होण्यासाठी आवश्यक पाऊस असताना नेमक्या त्याच परिस्थितीत पावसाने ओढ दिल्यामुळे अल्पशा पावसावर आलेली पिके करपत चालली आहे. ऊसाचा चारा म्हणूनही वापर होवू लागला.

जुलै अखेर बाजरी 9358, तुर 2600, सुर्यफूल 951, मुग 468, उडीद 110, भुईभूग 455, कापूस 2, मका 3982, सोयाबीन 12, इतर तृणधान्य 476 अशा एकूण 18414 हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. तालुक्यात एक जून पासून आजतागायत तालुक्यात सरासरी 82.14 मिमी पावसाची नोंद झाली सर्वात कमी मरवडे 32.5, तर सर्वात जास्त पाऊस मंगळवेढा 131.4 इथे नोंदविण्यात आला. याशिवाय बोराळे 128, मारापूर 93, आंधळगाव 55, हुलजंती 80.05, भोसे 55, इतक्या मिलीमिटर पावसाची नोंद या महसूल मंडळमध्ये झाली. गतवर्षी देखील पिकाची अवस्था अशीच होती. पण, विमा कंपनी तालुक्यातील खरीप विमा भरलेल्या 53847  शेतकऱ्यांवर अन्याय केला. यंदाही ऑनलाईन विमा भरण्याच्या तंबीमुळे सर्व्हरडाऊन अभावी अनेक शेतकरी देखील वंचीत राहिले. ज्यांनी विमा भरला त्यांचे लक्ष विमा कंपनीच्या भुमिकेकडे असले तरी विमा न भरलेल्याची ही माहिती घेणे आवश्यक आहे.

निसर्गाने सुरुवात केली म्हणून पेरणी केली आता ओढ दिल्याने पाण्यासाठी तहानलेल्या पिकाचे हाल बघवत नसल्यामुळे शेतात जाणेच टाळले
- सुरेश पवार, शेतकरी मंगळवेढा 

ऑनलाईन विमा भरताना सर्वर डाऊनमुळे भरता आला नाही शेतात पिक आहे. शासकीय मदत करताना सरसकट करण्याच्या दृष्टीने लक्ष दयावे
- महादेव कांबळे शेतकरी निंबोणी 

पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्यास आलेली पिकाने माना टाकल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. याबाबत सदस्थितीची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आली आहे .
-  नामदेव गायकवाड तालुका कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com