वादळी वाऱ्यामुळे भिंत अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

वैभव  देशमुख 
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मानेगाव (सोलापूर) : माढा तालुक्यातील मानेगांव परिसरात मोठ्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीत घराची भिंत पडून लक्ष्मण तात्या मोटे (वय ४२) हे शेतकरी मृत  झाले.

मानेगाव (सोलापूर) : माढा तालुक्यातील मानेगांव परिसरात मोठ्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीत घराची भिंत पडून लक्ष्मण तात्या मोटे (वय ४२) हे शेतकरी मृत  झाले.

मयत मोटे हे आपल्या शेतावर मुलासह गेले होते. सायंकाळी जोरदार वादळी वारा व पाऊस चालू झाला म्हणून ते वाकाव रस्त्याच्या कडेला वेणुबाई मोटे यांच्या घरी गेले व तेवढ्यात जोरदार वादळ व पाऊस चालू झाले. घरावरील पत्रे उडु लागले म्हणून लक्ष्मण व त्यांचा मुलगा बाहेर जाऊ लागले, मात्र याचवेळी पत्र्यावरील भिंत (कुंभी) मयत मोटे यांच्या अंगावर कोसळली व कमरेला मोठा मार लागला. नंतर त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आले व उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. तहसिलदार सदाशिव पडदुणे, माढ्याचे पोलिस उपनिरिक्षक अतुल बोस, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, तलाठी राऊत, ग्रामसेवक दळवी, गळगुंडे यांनी  कुटुंबियांचे सांत्वन केले. शासकीय मदतीसाठी शासनाकडे तहसिलदार अहवाल पाठवणार आहेत.

Web Title: due to wind storms wall fallen on farmer he dies