कर्तृत्ववानांचा स्वातंत्र्यदिनी गौरव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

कोल्हापूर - भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 69 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाले. यावेळी पोलिस दलातील राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी नैसर्गिक आपत्तीत विशेषत: पूर स्थितीत बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थांचाही प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महिला व बालविकास विभागाकडील माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत महिलांना प्रशस्तिपत्र देण्यात आले.

कोल्हापूर - भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 69 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाले. यावेळी पोलिस दलातील राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी नैसर्गिक आपत्तीत विशेषत: पूर स्थितीत बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थांचाही प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महिला व बालविकास विभागाकडील माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत महिलांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. तसेच वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत उत्कष्ट काम केलेल्या संस्था आणि व्यक्ती, तसेच ग्रामपंचायतींचा त्याचप्रमाणे कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी मदत करणाऱ्या संस्था, व्यक्ती तसेच एनसीसी ग्रुपचाही सत्कार करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा सत्कारही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते झाला.
 

यावेळी महापौर आश्विनी रामाणे, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपमहापौर शमा मुल्ला, अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलिस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, तसेच नागरिक उपस्थित होते.

Web Title: Efficient Independence glory