...तर कार्यकर्त्यांत शाब्दिक ‘दंगल’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

आटपाडी - निवडणुकीचे नगारे वाजू लागल्यापासून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. दोन मातब्बर नेते एकत्र येण्याची हालचाल असताना कार्यकर्त्यांत मात्र सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपाची जोरदार शाब्दिक ‘दंगल’ रंगली आहे. त्यातून दोन नेत्यांचे मनोमीलन झाले, तर कार्यकर्त्यांचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या राजकीय पटलावर देशमुख, पडळकरांचा बोलबाला आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी कामाच्या जोरावर चांगले संघटन केले. तालुक्‍यावर वर्चस्वासाठी देशमुख, पडळकर गट एकत्र येऊ लागल्याची चर्चा आहे. तालुक्‍याचा विकास, आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही नेते एकत्र येत असल्याचे बोलले जाते.
या दोन नेत्यांच्या एकत्र येण्यावर सोशल मीडियावर शाब्दिक ‘दंगल’ सुरू आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केलेत. ‘ताकद कमी झाली म्हणून आघाडीचा प्रस्ताव दिला’, तर कोण म्हणतं ‘गेल्यावेळी ११-१ ने मतं दिली विसरलात का?’ असा सवाल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांने केला आहे. त्यावर ‘विधानसभेला मागे टाकले आहे. लक्षात असू द्या’, असे कोणी तरी प्रत्युतर दिले आहे. कोणी ‘काय केले, दगाफटका दिला’, ‘समाजाची फसवणूक केली’ तर ‘प्रास्थापितांविरोधात लढाईची सुरवात केली आणि त्यांच्याशीच हातमिळवणी करण्याची वेळ का आली ? ’ असे अनेक सवाल-जवाब रंगलेत. तब्बल एकेका पोस्टवर चारशेंवर मते मांडली जात आहेत. दोन नेते एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असताना कार्यकर्त्यांची मने एक न होता एकामेकाची उणी-दुणी काढली जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची मने जुळणार का ? अशी शंका उपस्थित केली
जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - लाखो शहीद जवानांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. बलिदान, त्यागातून मिळालेले हे स्वातंत्र्य...

05.03 AM

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी महानगराध्यक्ष महेश जाधव आणि खजानिसपदी वैशाली क्षीरसागर...

05.03 AM

सांगली - एक जोरदार पाऊस झाला की शहरात दाणादाण उडते. ठिकठिकाणी तळी साचतात. नाले ओसंडून वाहतात. दुर्गंधीचे साम्राज्य पसरते....

04.33 AM