सोलापूर बाजार समितीची निवडणूक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली आहे.

१ जुलै रोजी मतदान तर ३ जुलै मतमोजणी होणार आहे. २९ मे ते २ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत देण्यात आली आहे. तब्बल दिड वर्षांपासून समितीवर प्रशासक नियुक्त आहे. पूर्वीच्या संचालक मंडळावर निवडणूकीच्या तोंडावर अपहाराचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय चुरस व रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

Web Title: election of solapur bazar samiti has been announced