निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज (ता. 25) सकाळी अकरा वाजता नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अमितकुमार सैनी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले असून त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठी राखीव ठेवावयाच्या जागा निश्‍चितीसाठी फेरआरक्षण काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

कोल्हापूर - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज (ता. 25) सकाळी अकरा वाजता नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अमितकुमार सैनी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले असून त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठी राखीव ठेवावयाच्या जागा निश्‍चितीसाठी फेरआरक्षण काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आरक्षण सोडतीबाबत आज राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या असून आयोगाच्या आदेशानुसारच आरक्षण सोडत प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे. गण व गट निवडणुकीसाठी आरक्षण निश्‍चितीसाठी सोडत काढली होती. जिल्हा परिषदेचे 69 मतदारसंघ होते. या वेळी दोन गट कमी झाल्याने गटांचाही प्रारुप आराखडा प्रसिद्ध केला होता. सोडत प्रक्रिया झाल्यानंतर त्यावर तसेच प्रारुप गट व गणांच्या रचनेवर हरकती घेण्यासाठी मुदत दिली होती. त्यानुसार 77 हरकती दाखल झाल्या होत्या. त्याची सुनावणी पुणे विभागीय कार्यालयामध्ये झाली. या वेळी हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम निर्णय 25 नोव्हेंबरला घेण्यात येईल, असे सांगितले. हरकतींवरील अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. असे असताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी 25 नोव्हेंबरला नागरिकांचा मागासप्रवर्ग व महिलांसाठी फेरआरक्षण काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हरकतींवर निर्णय होण्यापूर्वीच फेरआरक्षण काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे यापूर्वी घेतलेल्या हरकतींचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. यात म्हटले आहे, की जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्‍चित करावयाच्या आहेत. फेरआरक्षण 25 नोव्हेंबरला काढण्यात येणार असून त्याबाबत पंचायत समितीच्या कार्यालयास माहिती द्यावी.

दरम्यान, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षण निश्‍चित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जे जाहीर प्रकटन केले आहे, त्याप्रमाणेच फेरआरक्षण सोडत प्रक्रिया राबवावी. उद्या (ता.25) होणारी आरक्षण सोडत जाहीर प्रकटनाप्रमाणे होणार नसल्याचे समजते. तरी याबाबत योग्य ते आदेश द्यावेत आणि जनतेवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशी तक्रार य. ग. गिरी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Web Title: Elections for today lottery reservation