सांडपाण्याअभावी रखडली सोलापुरातील वीजनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

सोलापूर - पुरेसे सांडपाणी उपलब्ध होत नसल्याने मिथेनपासून वीजनिर्मितीचा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन सोलापूर महापालिकेने केले आहे.

सोलापूर - पुरेसे सांडपाणी उपलब्ध होत नसल्याने मिथेनपासून वीजनिर्मितीचा प्रकल्प रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन सोलापूर महापालिकेने केले आहे.

महापालिकेच्या देगाव येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मिथेन वायूपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मिथेन वायू किती प्रमाणात उपलब्ध होईल, त्यावर वीजनिर्मितीचे प्रमाण अवलंबून आहे.

सध्या 80 क्‍युबेक इतका वायू उपलब्ध आहे, प्रत्यक्ष वीज निर्मितासाठी किमान 200 ते 250 क्‍युबेक वायू असणे आवश्‍यक आहे. मात्र, शहरातील पाणीटंचाईमुळे सांडपाण्यावर नियंत्रण आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून मिथेन वायूसाठी आवश्‍यक प्रमाणात हे पाणी उपलब्ध होईनासे झाले आहे.

पुरेशा प्रमाणात मिथेन उपलब्ध होत नसल्याने वीजनिर्मितीस अडथळे येत आहेत. मात्र येत्या काही दिवसांत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल, याची खात्री आहे.
- यू. बी. माशाळे, उपअभियंता, सोलापूर महापालिका